पुणे: संपूर्ण राज्यात दस्तूरखुद्द अजित पवार यांच्या दौंड शुगर या खाजगी कारखान्याचे गुणगान होत असताना कारखाना असलेल्या आलेगावात मायभूमीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोसायटी पॅनलचा दारुण पराभव झाला. राहुल कुल समर्थक नाथा कदम व हेमंत कदम यांच्या गटाला 10 तर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलला अवघ्या 3 जागा मिळाल्या.
या मतदानातून सोसायटीच्या शेतकरी सदस्यांनी खाजगी कारखान्याच्या माध्यमातून गावागुंडाकडून होणारी मुजोरी झुगारून एक प्रकारे स्थानिक जि. प. सदस्य व दौंड शुगर चे संचालक विरधवल जगदाळे यांना सूचक इशाराच दिला आहे.
आलेश्वर सोसायटी वरील विजयाचा परिणाम पूर्व भागातील सोसायटी निवडणुकीवर होणार असून जायंट किलर नाथाबापू कदम यांचे सर्व स्थरातून कौतुक हॊत आहे.
Tags
news
