शिरपुर बाजार समिती मध्ये व्यापारी व हमाल मापाडी यांच्यात दरवाढीचा वाद, खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद मालाच्या हमालीची दरवाढ व्यापारी व शेतकऱ्यांसाठी अवाजवी - व्यापारी असोशिएशन, शिरपूर




शिरपुर बाजार समिती मध्ये व्यापारी व हमाल मापाडी यांच्यात दरवाढीचा वाद,
 खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद 

 मालाच्या हमालीची दरवाढ व्यापारी व शेतकऱ्यांसाठी अवाजवी - व्यापारी असोशिएशन, शिरपूर

शिरपुर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये व्यापारी व हमाल मापाडी संघ यांच्यात हमालीच्या वाढीव दराच्या वादातुन मागील २० ते २५ दिवसापासून कृषी उत्पन बाजार समितीचे खरेदी विक्रीचे व्यवहार बंद आहेत. याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी असून माजी जिल्हा परिषद सदस्य ओंकार आबा जाधव यांनी देखील आंदोलनाची हाक दिली आहे दरम्यान व्यापाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे सदरच्या विषया तोडगा निघत नसून व्यापाऱ्यां मुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे असे चित्र निर्माण होत आहे.
 व्यापारी असोशिएशन व हमाल मापाडी संघ वारंवार यांच्यात झालेल्या चर्चेत हा प्रश्न सुटत नसल्याने हा वाद विकोपाला गेला असुन हा तिढा सुटत नसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत असुन या बाबत व्यापारी कठोर भुमिका घेत आहेत असे आरोप होत आहेत. मात्र या बाबत सत्य परिस्थिीती व वास्तविकता या बाबत शेतकरी व जनतेत जागृतता व्हावी व शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांची भूमिका काय हे स्पष्ट व्हावे या साठी व्यापारी असोशिएशन यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी एक पत्रक जारी केले आहे.
यात त्यांनी प्रत्येक बाजार समितीत व्यापारी व हमाली चे दर बबात दर ३ वर्षांसाठी करार होत असतात. सदर करारात नमुद केल्याप्रमाणे कराराची मुदत संपल्यानंतर काही पटीने वाढ करून हमालीचे दर निश्चीत केले जातात व ते पुढील ३ वर्षांसाठी आमलात आणले जातात. त्या प्रमाणे शिरपुर बाजार समिती मध्ये देखिल तसा करार झालेला आहे. सदर कराराची मुदत ही सध्या संपुष्टात आलेली आहे. त्यात हमाल बांधवांनी २५ ते ३० टक्के हमाली दारात वाढ करणे बाबत व्यापारी असोसिएशन कडे मागणी केली आहे. सदर वाढीची टक्केवारी पाहता वाजवी पेक्षा जास्त हमालीची दर वाढवुन त्या मुळे खरेदी खर्चामध्ये त्या पध्दतीची वाढ होणार आहे. धुळे व जळगांव जिल्हयात असलेल्या बाजार समिती मध्ये असलेले हमालीचे दराच्या तुलनेत हे दर शिरपुर  बाजार समिती मध्ये सर्वात जास्त आहेत. याचे कारण असे की मागील काळात शिरपुर बाजार समिती मध्ये हमाली कराराच्या नमुद केलेल्या दारात १६ टक्के  वाढ झालेली आहे. त्याच प्रमाणे इतर बाजार समिती म्हणजे धुळे, चोपडा, दोंडाईचा शहादा व अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये व्यापारी व हमाली करारात नमुद केलेल्या हमाली दारात फक्त १० ते ११ टक्के वाढ झाली आहे. शिरपुर बाजार समितीत मागील करारात १६ टक्के वाढ झाल्याने इतर बाजार समितीच्या हमालीच्यास दारापेक्षा ५ ते ६ टक्के अतिरिक्त वाढ झाली आहे. त्यामुळे शिरपुरचे दर इतर बाजार समिती पेक्षा जास्त आहेत. तरी आता सध्य परिस्थीती हमाल बांधवानी वाढीव २५ते ३० टक्के दर वाढ मागणे चुकीचे व अवाजवी आहे. सदर हमाली दर वाढीचा परिणाम खरेदीचा खर्चावर होऊन यांचा सर्व आर्थिक भार हा शेतकऱ्यांवर पडतो. त्यामुळे इतर बाजार समितीच्या शेत मालाच्या भावापेक्षा हा खर्च विचारात घेऊन शिरपुर बाजार समिती मध्ये येणाऱ्या शेतमालाला भाव द्यावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये व्यापाऱ्यांवर नाराजी होत असते. व त्याचा परिणाम माल खरेदी विक्री व्यवहारा होत असुन शेत माल इतर बाजार समिती विक्रीला जात असतो व त्यामुळे शिरपुर बाजार समितीची आवक मध्ये घट होत आहे. त्याच प्रमाणे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खेडा खरेदी सुरु झाल्याने मालाची आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम शेतमाल खरेदी व्यापारावर झाला आहे. तरी हमाल बांधवांनी या सर्व बाबींचा विचार करून योग्य पध्दतीने इतर बाजार समिती प्रमाणे १० ते ११ टक्के दर वाढ मान्य करणे अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकरी बांधनांना देखिल आपल्या बाजार समितीत शेत मालास योग्य भाव देता येतील, परिणामी या मुळे बाजार समितीत शेतमालाची आवक मध्ये वाढ होणार आहे.
हमाली दर वाढ चा परिणाम शेतमाल व्यापारावर झाला  शेतक-यांच्या शेतमालाने भरलेल्या वाहनांचे इलेक्ट्रीक काट्यावर मोजमाप होते. मोजमाप करतांना हमाली कामाचे कोणत्याही प्रकारचे काम नसते तरी सुध्दा शेतकऱ्यांकडून हमालाची रक्कम वसुल करण्यात येते. शेतकरी बांधवांचा त्याला विरोध आहे. कारण हात न लावता हमाली वसुल होणे शेतकऱ्यांना अन्यायकारक वाटते. हमालांना त्यांच्या हमालीच्या व्यतिरीक्त ३०% लेव्हीसुध्दा देण्यात येते.

तरी हमाल बांधवांनी या सर्व बाबींचा विचार करुन योग्य पध्दतीने इतर बाजार समिती प्रमाणे सकारात्मक भूमिका घेणे व बाजार समिती तर्फे देखिल शेतकरी, व्यापारी व हमाल यांच्या प्रश्नावर समन्वयक तोडगा काढावा व कोणावर ही अन्याय होणार नाही असा निर्णय घ्यावा व मार्केट कमिटी ने पुढाकार घेऊन यावर सर्वसमावेशक असा तोडगा काढावा व अशी मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने