विरेगाव प्रतिनिधी दि:9(गणेश शिंदे)
जालना तालुक्यातील विरेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय मध्ये राष्ट्रीय कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष दिल्ली कार्यालयातील श्री राजेश सिंग यांनी भेट दिली व ग्रामपंचायत मध्ये योजनेविषयी उपस्थितांकडून माहिती घेऊन तपासणी करण्यात आली व त्यानंतर योजना विषय मार्गदर्शन केले
भूजलाचा होत असलेला अनियंत्रीत उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधीत होत असलेली महाराष्ट्रामध्ये भूजल उपशाचे प्रमाण प्रचंड यामध्ये कृषी क्षेत्राकरीता होणारा उपसा देखील अधिक आहे . यामुळे या क्षेत्रातील भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याने या क्षेत्रातील पाणलोट क्षेत्र अंशत : शोषित या वर्गामध्ये समाविष्ट आहेत अशा भागातील सिंचन विहीरींची क्षमता कमी झाल्यामुळे खोल विंधन विहीरींची संख्या वाढताना दिसून येत आहे
अटल भूजल योजनेची उद्दिष्टे : पाणी बचत उपाय योजना व जलसंधारण जलपुनर्भरण व्यवस्थापन पध्दतींचा अवलंब करणे . विविध विभागांच्या योजनांचे एकत्रीकरण साध्य करणे शाश्वत भूजल विकासासाठी गाव पातळीवर सक्षम संस्थात्मक व्यवस्था तयार करणे बळकट करणे सूक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर करून भूजलाच्या वापरावर मर्यादा आणणे सिंचन व्यवस्थेत सुधारणा करणे या विषय
दिल्ली कार्यालयातील श्री राजेश सिंग यांनी ग्रामपंचायत सदस्य व समिती सदस्य यांच्या सोबत चर्चा करुन मार्गदर्शन केले
या वेळी संरपच अमोल जाधव, उप संरपच सुनिल चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे,सौ तारामती मोठे, द्रोपताबाई खरात, वर्षा जाधव,आर्चना इंगळे, ग्रामशेवक शारदा साबळे, माया थोरात, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा येथील श्री नागेश कंधारे , श्री विष्णू घोडके, होते
पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालवली असुन ओलिता खाली जमीन कमी प्रमाण असुन कोरड वाहु क्षेत्र भरपुर असुन पाण्या अभावी म्हणावे तसे उत्पन्न निघत नसल्याने शेतकर्याची उन्नती होत नाही
अटल भुजल योजना प्रभावि पणे राबल्यास पाणी पातळी वाढ होऊन तुषार, सिंचन द्वारे पाणी देता येईल
आणि उत्पन्न वाढेल
Tags
news
