शिरपूर - आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या विविध मागण्यांसाठी लाटणे मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी शिरपूर किंवा इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे चार महिन्याचे थकीत मानधन तात्काळ मिळावे व इतर प्रश्न त्वरीत सुटावे यासाठी दि. १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालये, पंचायत समिती कार्यालयासमोर लाटणे मोर्चा काढून तीव्र आदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे. त्याचाच भाग म्हणुन शिरपूर पंचायत समिती समोर चोपडा जीन काली पिली स्टॅण्ड पासून आशा व गट प्रवर्तक दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता मोर्चा पंचायत समिती कार्यालयकडे निघेल, त्यानंतर पंचायत समिती शिरपूर येथे कार्यालायसमोर शिष्ट मंडळाद्वारे मांगण्याचे निवेदन दिले जाईल. त्यानंतर म. उपविभागीय अधिकारी सो शिरपूर यांनाही निवेदन दिले जाईल.
आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा व गटपवर्तक संघटना व महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्या वतीने राज्यातील ६८ हजार आशा व ४ हजार गठ प्रवर्तक खालील प्रमाणे निवेदन करीत आहोत. महाराष्ट्रात शहरी व ग्रामिण भागात कोवीड-१ लसीकरणांतर्गत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत सक्ती काम लावण्यात येत आहे. याबाबत कोणताही मोबदला आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकां दिला जात नाही. आशा स्वंयसेविकांची नेमणुक कामावर आधारीत मोबदला या तत्वानुस करण्यात आलेली आहे. कोवीड-१९ च्या कामासाठी केंद्र शासनाकडून मिळणारा एक हजार
रुपये प्रोत्साहनपर भत्ता ऑक्टोंबर २०२१ पासुन देण्याचे बंद करण्यात आला होता तो पुर्ववत देण्याचे आदेश केंद्र शासनाने दिलेले आहेत. सकाळ पासुन संध्याकाळपर्यंत कोवीड-१९ च्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे आशा स्वयेसेविकांना व गटप्रवर्तकांना त्यांची मुळ कामे करण्यासाठी अजिबात वेळ मिळत नसल्यामुळे त्यांना दरमहा कोवीड- १९ काळात मिळत असलेल्या मोबदल्यापेक्षा सध्या खुप कमी मोबदला मिळत आहे. त्यामुळे त्यांचे न भरुन निघणारे आर्थिक नुकसान होत आहे. त्यांना मिळणारा तुटपुंजा मोबदल्याही वेळेवर दरमहा मिळकत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाप्रती त्यांच्या भावना संतप्त होवुन आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मनामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे. याकडे आपण गंभिर्याने लक्ष देवुन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे ऑक्टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०२१ व जानेवारी २०२२ या चार महिन्याचे थकीत मानधन त्वरीत देवुन येथुन पुढे दरमहा पाच तारखेपर्यंत मानधन देण्याची व्यवस्था करावी. अशी आमची प्रमुख मागणी आहे व इतर मागण्याचे निवेदन त्या दिवशी दिले जाणार आहे.
शासनाने वरील मागण्या दि. १४ फेब्रुवारी २०२२ पावेतो मागण्या मान्य न केल्यास दि. १४/०२/२०२२ रोजी आशा व गटप्रवर्तक संघटनेने आपल्या कार्यालया समोर आंदोलन करण्याचे निर्णय घेतलेला आहे.
या निवेदनावर हिरालाल परदेशी अध्यक्ष आशा गटप्रवर्तक संघटना व तालुका अध्यक्ष एडवोकेट संतोष पाटील, तालुका कार्याध्यक्ष किशोर सूर्यवंशी व आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या कार्यकर्ते अरुणा देवरे, पुष्पा महाजन, आशा महिळारे ,स्मिता दोरीक, मालती इंदवे इत्यादी व पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.
Tags
news
