किरीट सोमय्या यांच्याशी धक्का बुक्की, सोमय्या रुग्णालयात दाखल



पुणे - भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. आज किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. याबाबत सोमय्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करणार होते. परंतु शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच किरीट सोमय्या यांना पुणे महापालिकेत जाताना शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली आहे. पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर किरीट सोमय्यांना धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी किरीट सोमय्या पायऱ्यांवर कोसळले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या वरून भाजप नेते आक्रमक झाले असून राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित करून घटनेचा निषेध केला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने