बिग ब्रेकिंग! लता मंगेशकर यांचं निधन भारताची गानकोकिळा म्हणून जगभरात प्रसिद्धी संगीतप्रेमी व संगीत विश्वावर फार मोठा आघात




मुंबई-  आज भारताच्या संगीत विश्वासाठी फार मोठी धक्कादायक व आघात करणारी अशी बातमी समोर आली असून भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे .सदर वृत्त बाहेर येताच संपूर्ण भारत विश्वावर शोककळा पसरली असून जगभरातील संगीतप्रेमींना फार मोठा धक्का बसला आहे.

लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या २८ दिवसांपासून त्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होत्या. यादरम्यान त्यांना अनेकदा जनरल वॉर्ड आणि आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. नुकतेच त्यांना आयसीयूमधून हलवण्यात आले होते, मात्र आज सकाळपासून त्यांची प्रकृती ढासळू लागली आणि त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले.

लता मंगेशकर कोरोनाची लागण झाल्याने आणि न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांना ८ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे प्रतीत समधानी आणि त्यांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होती व त्यांच्या प्रकृतीची पुरेपूर काळजी घेण्यात येत होती. मात्र आज सकाळी 8 वाजून 12 वाजता लतादीदी बाबत दुःखद बातमी समोर आली आणि प्रकृतीशी झुंज देत त्यांनी अखेर जगाचा अखेरचा निरोप घेतला.
लतादीदींनी मागील 50 ते 60 वर्षाच्या कालावधीत संगीत विश्वासाठी अलौकिक असे योगदान दिले असून त्यांची हजारो गाणीही अजरामर झाली आहेत. जगभरातील संदीप प्रेमींना संगीताच्या माध्यमातून तृप्त करण्याचे अलोकिक वरदान त्यांच्या आवाजाला लागले होते आणि त्यांची भारताची गानकोकिळा म्हणून जगभरात ओळख होती. अशा या संगीत विश्वासाठी अजरामर काम करणाऱ्या दिगझ कलाकाराने संगीत क्षेत्रातून एक्झिट घेतली आहे. लतादीदींनी गायलेले गाणे जीवसृष्टी असेपर्यंत अजरामर राहतील याबाबत शंका नाही अशा या थोर महान विभूती भावपूर्ण श्रद्धांजली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने