धुळे- येथे पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका माथेफिरुने २२ वर्षीय तरुणाचा लाकडी दांडक्याने हल्ला करून खून केल्याची घटना आज शनिवारी सकाळी शहरातील मिल परिसरात घडल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी तिघा भावांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. अन्य एक जण फरार झाला आहे. निखिल साहेबराव पाटील वय २२ रा. विद्युत नगर, सुरतवाला बिल्डींगगवळ, धुळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचा भाऊ दिपक साहेबराव पाटील यांने आज शनिवारी धुळे शहर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. या तक्रारीवरुन मयुर मच्छिंद्र शार्दुल, मनोज मच्छिंद्र शार्दुल व मुकेश मच्छिंद्र शार्दुल या तिघा भावांविरूद खनाचा गुन्हा दाखल करण्यात
या तिघा भावांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत निखिल पाटील आणि आरोपी मयुर शार्दुल हे दोघे मित्र होते. नेहमी त्यांचे एकमेकांकडे येणे-जाणे होते. अशातच मयुरच्या पत्नीशी मयत निखिल याचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. असा संशय आल्याने मयुर काही दिवसांपासून त्याच्या मागावर होता. काही दिवसापासून निखिल बेपत्ता होता याबाबत त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात मिसींगची नोंद देखील केलेली होती. बेपत्ता झाल्यानंतर निखिलचा मयुर व त्याचे भावंड शोध घेत होते. अखेरीस तो सूरत येथे त्याच्या मावशीकडे असल्याची खबर त्यांना मिळाली. यादरम्यान त्यांनी निखिलच्या कुटुंबियांनाही धमकावले होते. काल रात्री निखिलला तिघा भावांनी धुळ्यात बोलावून घेतले व त्याला एका जिममध्ये घेऊन जात तेथे त्याला लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आज ही घटना उघडकीस येताच
मिल परिसरात खळबळ उडाली. मयत निखिलच्या भावालाही काल रात्रीच मारहाण करण्यात आली होती. तो जखमी अवस्थेत आज सकाळी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी मयुर, मनोज व मुकेश शार्दुल या तिघा भावांविरुद्ध कलम ३०२, ३२६, ३६४ ( अ ), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करीत मयुव व मुकेश या दोघांना ताब्यात घेतले. मनोज मात्र पसार झाला आहे. अधिक तपास पो. नि. नितीन देशमुख हे तपास करीत आहेत.
Tags
news
