अनेर डॅम येथील कृतीशील शिक्षक श्री हेमराज अहिरे सर यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर*




शिरपूर-महादेव आदिवासी माध्यमिक आश्रम शाळा अनेर डॅम तालुका शिरपूर येथील कृतिशील शिक्षक श्री हेमराज अहिरे सर यांची जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नागमठाण तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे .हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थित प्रदान  करण्यात येणार आहे. श्री हेमराज आहिरे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असून त्यांनी सामाजिक क्षेत्रात,सांस्कृतिक क्षेत्रात ,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विज्ञान प्रदर्शन राज्य,राष्ट्रीय पातळी वर सहभाग, शाळा बंद शिक्षण सुरू ,शिक्षण सेतू अभियान ,स्वच्छता अभियान, नवचैतन्य उपक्रम ,कोवीड 19जनजागृती, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा,बेटी बचाव बेटी पढाव ,सी. सी .आर .टी .दिल्ली चे डी .आर. पी .या सर्व कार्याचे दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
दीपक अनुष्ठान (उपनगराध्यक्ष पारोळा) सुरेश अहिरे ,अशोक माथने ,मिलिंद अहिरे, शंकर अहिरे, गंगाराम झांजरे ,चिंधू गिरधर ,भास्कर पवार,  मान्यवरांनी त्यांच्या सत्कार केला.
आश्रम शाळेचे मुख्याध्यापक संजय बोरसे व सुभाष सैंदाणे व संस्थेचे अध्यक्ष रेहमान दादा वळवी व सचिव इंद्रसिंग भाऊसाहेब यांनी समाधान व्यक्त केले या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने