दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद : स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत स्वच्छ्ता दूत ब्रँड ॲम्बेसेडर नियुक्ती* दोडाईचा (अख्तर शाह)



स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा 2.0 अभियानांतर्गत दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदे मार्फत स्वच्छते विषयक नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता स्वच्छता दूत ब्रँड अँबेसिडर म्हणून शहरातील प्रचलित व प्रख्यात धर्मगुरूंची नियुक्ती करण्यात आली. शहरातील सर्व नागरिकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचावा याकरिता प्रभावी माध्यम म्हणून धर्मगुरू मार्फत हे जनजागृती नागरिकांमध्ये करण्यात येणार आहे. धर्मगुरूंना समाजात मानाचे स्थान असते तसेच त्यांनी दिलेल्या संदेशाचे नागरिक पालन करतात या उद्देशाने त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.करिता दोंडाईचा येथील ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय दोंडाईचा ओम शांती केंद्राच्या संचलिका ब्रह्मकुमारी लीला दीदी तसेच मौलाना तथा काझी श्री अकरम रजा शब्बीर शेख यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर नियुक्तीचा कार्यक्रम  दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडला.सदर कार्यक्रम अंतर्गत आरोग्य विभागातील सर्व  सफाईची कामे करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यां पैकी उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई कामगारांना नगर परिषदेमार्फत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट झाडू काम करणारे कर्मचारी, उत्कृष्ट गटर साफ करणारे कर्मचारी, उत्कृष्ट घनकचरा संकलन करणारे कर्मचारी व उत्कृष्ट घंटागाडी चालविणारे चालक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी  डॉ प्रवीण निकम यांनी सर्वांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले तसेच आगामी काळात सर्वांनी चांगल्याप्रकारे कामगिरी करावी त्याकरिता सर्व कर्मचाऱ्यांना संबोधित केले. तसेच मौलाना अकरम रजा शब्बीर शेख व ब्रह्मकुमारी लीला दीदी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व मनोगत व्यक्त केले. दरम्यान कोरोना काळात व सध्याच्या स्थितीत नगरपरिषदेचे कर्मचारी दोंडाईचा शहरास अविरत पणे स्वच्छतेविषयक सेवा पुरवित आहे. त्याकरीता या सर्व कर्मचारींचे त्यांनी आभार मानले. 
सदरच्या कार्यक्रमास दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रवीण निकम,  मौलाना तथा काझी अकरम रजा शब्बीर शेख ब्रह्मकुमारी लीला दीदी स्वच्छता निरीक्षक शरद महाजन संतोष माणिक,मुकादम रघुनाथ बैसाने तसेच आरोग्य विभागातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने