अजंग येथे शेतकरी कृषी धोरण योजनेची माहिती*



धुळे तालुक्यातील अजंग येते संघर्ष समिती व महावितरण चे सहाय्यक अभियंता एल. के. सोनवणे यांनी एकत्रित परिसरातील शेतकरी यांच्या रोजच्या समस्या व विज बिल भरणा याबाबत माहितीसाठी बैठक घेण्यात आली, तरी सदर बैठकीत सहाय्यक अभियंता श्री.सोनवणे यांनी सर्व शेतकऱ्यांना माहिती दिली की, दि.31 मार्च 2022 पर्यंत सर्व शेतकरी यांनी कृषी धोरण 2020 योजनेत सहभागी व्हावे, सदर योजनेत ग्राहकांना माहे सप्टेंबर 2020  पर्यंतचे विज देयकवर 50% ते 67% सूट देण्यात आली आहे, तरी सदर योजनेत दि. 31 मार्च 2022 पर्यंत सहभागी झालेच पाहिजे असे आव्हान महावितरण तर्फे करण्यात आले, तसेच शेतकरी ग्राहकांची विविध अडचणी आहेत ज्यात विद्युत रोहित्रवर केबल बदलविणे, वितरण बॉक्स बदलविणे, नवीन विद्युत रोहित्र करणे, तरी ह्या सर्व अडचणी साठी काम करण्यासाठी जे शेतकरी ग्राहक बिलाचा भरणा करतात त्यापैकी 33% रक्कम ही त्याच ग्रामपंचायत अंतर्गत वरीलप्रमाणे काम करण्यासाठी उपलब्ध होते, तरी संबंधित विद्युत रोहित्र वरील सर्व ग्राहकांनी जर आपल्या पूर्ण बिलांचा भरणा केला व थकबाकी मुक्त झाले तर तर विद्युत रोहित्र वर उपलब्ध 33% निधीच्या अनुसरून शेतकरी ग्राहकांचे संबंधित काम केले जातील असे श्री.सोनवणे सहाय्यक अभियंता मूकटी कक्ष यांच्या वतीने सांगण्यात आले.
तसेच कृषी पंप साठी नवीन विज जोडणी देने सुद्धा महावितरण कडून सुरूच आहे, त्यासाठी ज्या ग्राहकांना विद्युत जोडणी आवश्यक आहे.त्यांनी सर्वांनी महावितरण कंपनीच्या नियमानुसार मुकटी कक्ष कार्यालयास अर्ज करावा, त्यातील 30 मिटर पर्यंत अंतर असणाऱ्या ग्राहकांना त्वरित विद्युत जोडणी देण्यात येणार आहे.व 30 मिटर ते 200 मिटर अंतर असणाऱ्या ग्राहकांना सुद्धा उपलब्ध कृषी आकस्मिक निधीतून विज जोडणी देण्यात येणार आहे. सर्व परिसरातील ग्राहकांचे शंकांचे निरसरण केले तसेच या माहितीमुळे सर्वच शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले, व श्री.सोनवणे साहेबांचे आभार मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने