कर्ले पाझर तलाव द्वारे 92 टी सी एम जलसाठा निर्माण होणार* *सभापती अनिता पवार यांची माहिती; कर्ले पाझर तलाव दुरुस्ती चा शुभारंभ* दोडाईचा (अख्तर शाह)




दोंडाईचा- माजी मंत्री आ जयकुमार रावल साहेब यांच्या सूचनेनुसार कर्ले गावाच्या पाझर तलाव दुरुस्ती साठी 33 लाखाचा निधी मंजूर केला असून या दुरुस्ती नंतर या पाझर तलावात 92 टी सी एम जलसाठा निर्माण होणार असल्याची माहिती शिंदखेडा पंचायत समितीच्या सभापती सौ अनिता राकेश पवार यांनी कामाच्या शुभारंभ प्रसंगी केले
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि प सदस्य महावीरसिंह रावल होते तर प्रमुख पाहुणे भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील,  म्हणून पंचायत समितीचे उपसभापती राजेश पाटील , सरपंच रेखा पवार, अभियंता हर्षल पाटील,  उपसरपंच गोकुळ बेडसे, माजी प स सद्स दगाजी देवरे,  नथ्थू पवार , निंबा चव्हाण, माजी सरपंच साहेबराव पवार, दिनेश ठाकरे,  पोलीस पाटील प्रफुल्ल देवरे, पंडित वाघ, रमेश मोरे, रविंद्र खंडेराय,  भगवान ठाकरे, विक्रम पाटील, सोसायटीचे चेअरमन  राजू नामदेव पवार,तंटामुक्ती अध्यक्ष संजय चव्हाण, सुनील चव्हाण, प्रवीण चव्हाण, सागर चव्हाण, दादाभाऊ ठाकरे, मनोहर बेडसे, धनराज भदाणे, भिकन देवरे, , आदी मान्यवर उपस्थित होते
   यावेळी बोलताना जि प सदस्य महावीरसिंह रावल म्हणले की, कर्ले गावाची जलयुक्त शिवार ची कामे आदर्श गावात निवड झाल्याने अत्यंत कमी झाली होती म्हणून आ जयकुमार रावल यांनी जास्तीत जास्त सिंचनाची कामे कर्ले गावात करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार भविष्यात देखील सिंचनाची कामे गावात होणार आहेत, उपसभापती राजेश पाटील यांनी गावाच्या गाव दरवाजा साठी आमदार निधी तुन 20 लाखाचा निधी दिला असून ते काम देखील लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली, सूत्रसंचालन पोलिस पाटील प्रफुल्ल पाटील यांनी केले
दरम्यान कर्ले गावच्या पाझर तलावावर कर्ले शिवारातील जवळपास अर्धी शेती अवलंबून असून गावाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील अवलंबून आहे कमी पर्जन्यमान मुळे हा तलाव भरत नव्हता आणि याला गळती देखील होती आता साठवण क्षमता वाढून गळती देखील थांबणार आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने