आठवीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेतला . आज , १२ फेब्रुवारीला सायंकाळी सातच्या सुमारास देऊळगाव साकर्शा ( ता . मेहकर ) येथे ही घटना उघडकीस आली . लक्ष्मी संतोष सपकाळ असे : आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे . लक्ष्मीच्या वडिलांचे गावात किराणा दुकान आहे . तिने आत्महत्या केली तेव्हा वडील दुकानावर तर भाऊ बाहेर गेलेला होता . आईसुद्धा बाहेर गेलेली होती . घरात एकट्याच असलेल्या लक्ष्मीने गळफास घेतला . आई बाहेरून आल्यानंतर तिला मुलीने गळफास घेतल्याचे दिसले . तिने हंबरडा फोडला . घटनेची माहिती जानेफळ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली वृत्त लिहीपर्यंत पुढील कारवाई सुरू होती
Tags
news
