वर्षभरापूर्वीच विवाह झालेल्या जोडप्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबजनक घटना मोताळा तालुक्यातील इब्राहिमपूर शिवारात आज , ९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता उघडकीस आली . शिवशंकर रामभाऊ सिरकरे ( ३० ) व कल्पना शिवशंकर सिरकरे ( ३५ , दोघेही रा . कोथळी , ता . मोताळा ) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नावे आहेत . पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , शिवशंकर आणि कल्पना या दोघांचेही हे दुसरे लग्न होते . वर्षभरापूर्वी त्यांचे लग्न झाले होते . आज दोघेही नेहमीप्रमाणे शेतात गेले . दुपारी १२ वाजता इब्राहिमपूर शिवारातील शेतात दोघेही मृतावस्थेत आढळले . त्यांच्याजवळ मोनोसील नावाचे विषारी औषध आढळले . घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला . दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुलडाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले . दोघांनी आत्महत्या का केली हे मात्र कळू शकले नाही . तपास बोराखेडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक यशवंत तायडे व पोकाँ सुनील भवटे करीत आहेत
Tags
news
