नांदुरा : - तालुक्यातील जिगाव येथे पूर्णा नदीपात्रमधे थर्माकॉलची नाव तयार करुन रेती काढण्याचे काम चालू होते , याची माहिती मिळताच नांदुरा तहसीलदार राहुल तायडे यांचे पथक जिगाव पूर्णा नदीपात्रामध्ये दाखल झाले , तसेच मा , जिल्हाधिकारी श्री . राममूर्ति , अप्पर जिल्हाधिकारी श्री , धनंजय गोकटे व उपविभागीय अधिकरी श्री मनोज देशमुख यांच्या मार्गदर्शनामध्ये नादूरा तहसीलदार श्री . राहुल तायड़े व पथक मंडळ अधिकरी श्री , संतोष बंगाले , तलाठी श्री देशमुख , तलाठी श्री . सोनोने , तलाठी श्री . माळी , श्री , शकील अहेमद पटेल व कोतवाल सानप या पथकाने कार्यवाही केली , या ठिकाणी थर्माकॉलची नाव तयार करुण त्याद्वारे रेती उपसाचे काम चालू होते , २ ब्रास रेती व नाव नदी काठावरून काढण्यात आली , जप्त करुण रेती काढण्याची सर्व साधने नष्ट करण्यात आली , नाव जाळुन टाकली व इतर साहित्य जप्त करण्यात आले . यांची माहिती नांदुरा तहसीलदार राहुल तायडे यांनी यांच्या प्रेस नोट द्वारे देण्यात आली
Tags
news
