थाळनेर (प्रतिनिधी)
भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांना त्यांचे आजोळ असलेल्या शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे नुकतीच श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लता दीदींच्या आठवण जपण्यासाठी गाव दरवाजास त्यांचे नाव देण्यात येणार आहे. लता दीदींच्या अस्थिकलश थाळनेर गावात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांचे नुकतेच निधन झाले. लतादीदींचे आजोळ असलेले शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध मान्यवरांनी लतादीदींच्या गावातील बालपणीच्या थाळनेर गावातील त्यांच्या वास्तव्याच्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी मान्यवरांनी लता मंगेशकर यांची आठवन कायम राहावी म्हणून त्यांचा पुतळा उभारण्यात यावा.लतादीदींच्या नावाने संगीत अकॅडमी गावात सुरू करण्यात यावी. ते रहात असलेले बालपणीचे घर शासनाने स्मारक म्हणून जाहीर करावे.लोकनियुक्त सरपंच प्रशांत निकम यांनी सांगितले की गावात लवकरच गाव दरवाजा उभारण्यात येईल व त्यास लतादीदींचे नाव देण्यात येईल असे जाहीर केले.
यावेळी धुळे जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेंद्रसिंग जमादार, लोकनियुक्त सरपंच प्रशांत निकम, पंचायत समिती सदस्य विजय बागुल, पीएसआय कृष्णा पाटील, माजी सरपंच भरत मराठे, एकनाथ जमादार, रमेश मराठे, आनंदराव पाटील,धनराज मराठे, श्याम ठाकरे, वामन कोळी,ग्रामपंचायत सदस्य रुपेश निकम, नवनीत वाडीले जुबेर मन्यार, भटू शिरसाठ, अनिल मराठे ,श्याम भिल, अलकाबाई शिरसाठ ग्राम विकास अधिकारी वेताळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष मराठे, रमेश बाबाजी अरुण जमादार, नंदलाल मराठे, डोंगर कोळी,कुबेर जमादार,चैतन्य भारती, तुमडू सिंग जमादार, उज्वल निकम,किशोर पाटील, विजय वाडीले,प्रताप मराठे,आकाश मराठे, जितेंद्र माळी, मुकेश ठाकरे, पत्रकार प्रदीप मराठे ,हेमंत चौधरी मधुकर शिरसाठ व अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर बहुसंख्य गावकरी उपस्थित होते. गानसम्राज्ञी लता दीदींना गावकऱ्यांनी नयनांनी श्रद्धांजली अर्पण केली
Tags
news
