मध्यरात्री कार मधून गुटख्याची वाहतूक करणारी कार पकडली नांदुरा पोलिसांची मोठी कारवाई सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त तर कार चालक फरार होण्यास यशस्वी मलकापूर - उमेश ईटणारे




मध्यरात्री कार मधून गुटख्याची  वाहतूक करणारी कार पकडली 
नांदुरा पोलिसांची मोठी कारवाई
 सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
 तर कार चालक फरार होण्यास  यशस्वी

 मलकापूर - उमेश ईटणारे

 अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कारला नांदुरा पोलिसांनी पकडले , मात्र चालक फरारी होण्यास यशस्वी झाला . पोलिसांनी कारसह प्रतिबंधित गुटखा असा एकूण सव्वापाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . काल , ६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री नांदुरा - मलकापूर रोडवरील नायगाव फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली . एका कारमधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती नांदुरा पोलिसांना मिळाली होती . माहितीच्या आधारे पोलिसांनी नायगाव फाट्याजवळ सापळा रचला . तिथे हॉटेल स्वादजवळ कारला ( क्र . एमएच ०१ सीजे ०६५ ९ ) पोलिसांनी अडवले . कार उभी करून अंधाराचा फायदा घेत चालक फरारी झाला . पोलिसांनी कारची झडती घेतली असता कारमधून २ लाख १५ हजार ५० रुपयांचा विमल गुटखा , ३ ९ हजार ६०० रुपयांचा केसरयुक्त पानमसाला , ४३ हजार रुपयांची तंबाखू व २ लाख २५ हजार रुपयांची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 5 लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . नांदुरा पोलीस ठाण्यात फरारी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास नांदुरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री . मिरगे करीत आहेत

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने