शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील बोरगांव येथे दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी मारुती मंदिर परिसरात महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली.
भागवताचार्य ह.भ.प. श्री सुनिल महाराज जोशी यांच्या प्रमुख देखरीखी खाली महादेव मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय जल्लोषात पार पडला.
शनिवारी दिनांक 5 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता मंडप पूजन, गणपती पूजन, जलाधिवास, पुण्याह वाचनम, मातृका पूजनम व सायंकाळी 4 वाजता आरती करण्यात आली. रविवार दिनांक 6 फेब्रुवारी प्रांत पूजन, देवता स्थापन, धान्यदिवस, न्यासविधी व सायंकाळी 4 वाजता आरती तसेच रात्री 9 वाजता संकीर्तनाचा कार्यक्रम झाला.
दिनांक 7 फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी ठीक 11 वाजता महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली व महाप्रसाद दुपारी ठीक 12 वाजेपासून 4 वाजेपर्यंत चालला.
महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रियदर्शिनी सूतगिरणीचे चेअरमन श्री भुपेशभाई पटेल, जि प अध्यक्ष डॉ तुषार रंधे, जि प मा उपाध्यक्ष श्री काशिनाथ राऊळ, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री बबनभाऊ चौधरी, कारखाना संचालक भरत पाटील, योगेश बोरसे, जगतसिंग राजपूत, बाबा पाटील, निवृत्त पोलीस निरीक्षक महेंद्रसिंग राजपूत, नितीनबाबा गिरासे, नारायण चौधरी व तालुक्यातील सामाजिक राजकीय स्थरातील मान्यवरांनी उपस्थिती दिली.
बोरगांवचे मूळ रहीवासी ह मु कल्याण ठाणे येथील बोरगांवकर बिल्डर अँड डेव्हलपर्स चे मालक श्री संजय धोंडू बोरगांवकर यांनी मंदिरासाठी एक लाखाची मदत केली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी सैनिक श्री दगेसिंग राजपूत, माजी सरपंच श्री रघुनाथ कोळी, बोरगांव सरपंच तथा सरपंच महासंघ तालुका अध्यक्ष श्री योगेंद्रसिंग सिसोदिया, विठ्ठल झुलाल कोळी, सखाराम निळकंठ येशी, प्रकाश राजाराम न्हावी, जयराम पोपट पाटील, योगेंद्र दगेसिंग राजपूत, सोनू आनंदसिंग राजपूत, राहुल रोहिदास कोळी, दीपक पदमसिंग राजपूत, लखा धनगर, खंडू झिंगा राजपूत, तानकु भिल, बापू भिल, पांडुरंग कोळी, संजीव सजन पाटील, खंडू राजपूत, बापू जोशी तसेच गावातील ग्रामस्थांची व तरुण युवकांची मदत लाभली.
Tags
news
