शिरपूर : शिरपूर वरवाडे नगरपरिषद शिक्षण मंडळ सभापती राजेद्र जगदीश अग्रवाल यांची शि.व.न.प. ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
शिरपूर वरवाडे नगरपरिषद शिक्षण मंडळ संचलित क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले न.प.प्राथ. शाळा क्र. ९ वरवाडे शिरपूर व सगुनाबेन चंपकलाल वैद प्री-प्रायमरी शाळा वरवाडे शिरपूर व न.प.प्राथ.शाळा क्र. ६ शिरपूर येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण सोहळा शिक्षण मंडळ सभापती राजेद्र जगदीश अग्रवाल यांच्या शुभस्ते संपन्न झाला.
या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून शिक्षण मंडळ उपसभापती खतीब शे. अजीज, माजी उपनगराध्यक्ष मोतीलाल दौलत माळी, माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ डिगंबर माळी, शिक्षण मंडळ सदस्य देविदास अर्जून माळी, अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हा उपाध्यक्ष संतोष माळी, शिक्षण मंडळ सदस्य हिरालाल पोपट मराठे, किशोर जगन्नाथ माळी, सिद्दिक् तेली, सुरेश अहिरे, सुरेश चौधरी, युवराज माळी, मोहन रामकृष्ण चौधरी, श्रीराम सोनवणे, श्रीमती भटाबाई तुकाराम धनगर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल सोनवणे यांनी केले. न.प.शाळा क्र. ९ व ६ येथील प्रभारी मुख्याध्यापिका सौ. सुनिता सोनवणे, प्रभारी मुख्याध्यापिका सौ.संध्या पी.माळी, उपमुख्याध्यापिका सौ. पल्ल्वी राजपूत, तिन्ही शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते.
स्वच्छ अभियान अंतर्गत शि.व.न.प. ब्रॅन्ड अॅम्बेसिडर म्हणून सभापती राजेंद्र अग्रवाल यांची निवड झाल्याने सर्व मान्यवर व सर्व शिक्षक वृंदतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
Tags
news
