आ. अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते मयत विद्यार्थ्याच्या पालकाला शासकीय मदतीचा धनादेश वितरित




शिरपूर : माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते मयत विद्यार्थ्याच्या पालकाला शासकीय मदतीचा धनादेश वितरित करून त्यांचे सांत्वन करण्यात आले.

जि.प. शाळा व्हर्‍यापाणी येथील इयत्ता तिसरीतील विद्यार्थी केतन नारद धानका हा पावसाळ्यात विहिरीत पडून मयत झाला होता. या विद्यार्थ्याचे पालक नारद गोविंदा धानका यास दि. 3 फेब्रुवारी 2022 रोजी आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते75 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंपालाल गिना पावरा उपस्थित होते. राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान 75,000 रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
 या प्रसंगी केंद्र प्रमुख किशोर वेडु भदाणे, मुख्याध्यापक दिलीप शंकर महाजन, माजी ग्रा.प. सदस्य गुलाब धानका, शिवराम निरब्या पावरा, सामाजिक कार्यकर्ता महेश वेचान धानका उपस्थित होते.
          सदरील अपघात विमा मिळवून देण्याकामी जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल यांनी विशेष मदत केली तर गटशिक्षणाधिकारी शांताराम चिंधु पवार, शिक्षण विस्तार अधिकारी डाॅ. नीता सोनवणे यांनीही सहकार्य केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने