*गणेश मंदीर,वरवाडे येथे गणेश जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न*

                           


     


   शिरपूर —गणेश मंदीर,वरवाडे येथे गणेश जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम राबविण्यात आले.त्यात दि.०४/२/२०२२ सकाळी गणेश स्तोत्र वाचन,व आरती करण्यात आली,वरवाडे येथे पूर्ण गावात प्रसादाचे पाकीट वाटण्यात आले आणि संध्या.४ वा.लखन गबा माळी या नव दाम्पत्य हस्ते सत्यनारायणाची महापुजा,सर्व भक्तांसह,गावातील प्रतिठित मान्यवराच्या  उपस्थितीत महाआरती करण्यात आली तसेच रात्री ९ वा.संत सावता माळी भजनी मंडळाने भजनांचा आनंद घेतला त्यात शिरपूर पंचक्रोशीतील भजनी मंडळ —वनावल,जातोडा,बोरगाव,हिंगोणी,गिधाडे,उंटावद,बाभुळदे,सावळदे,साकवद,वाघाडी,करवंद,दहिवद,खामखेडा तसेच शिरपूर शहरातील श्रीराम मंदिर भजनी मंडळ शिरपूर ,खंडेराव मंदिर भजनी मंडळ शिरपूर,संत सावता माळी भजनी मंडळ वरचेगाव रथगल्ली शिरपूर,साईनाथ भजनी मंडळ मार्केट यार्ड शिरपूर ,माऊली भजनी मंडळ करवंद नाका शिरपूर ,श्रीदत्त मंदिर भजनी मंडळ चौधरी गल्ली शिरपूर, संत सावता माळी हरीपाठ महिला मंडळ वरवाडे या सर्व भजनी मंडळांनी अभंग,भावगीत,गवळणांचा आनंद घेतला जनु भजनांचा मेळा होता   *संत समागमी धरावी आवडी,करावी तातडी परमार्थाची* कार्यक्रमात महिला वर्ग,आणि तरुणांनी विशेष  परिश्रम घेतले.           *आयोजक— श्री गणेश मंदिर व मित्र परिवार वरवाडे*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने