रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा*
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे आरोग्य सेवेचा विस्तार
मंगेश चिवटे व सहकाऱ्यांच्या परिश्रमाचे फळ
पत्रकार रणवीर राजपूत, ठाणे
मंगेश चिवटे पोस्ट :- मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे आरोग्य सेवेचं लोण आता ठाणे,मुंबईच्या सीमा पार करत २२ जिल्ह्यात पोहोचले,ही गोष्ट राज्यातली गोरगरीब,निराधार,निर्धन,निराश्रित लोकांच्या दृष्टीने संजीवनी असून, त्यांना जीवन जगण्याची नवी उमेद निर्माण करणारी आहे,असे प्रतिपादन करून ठाणे-गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अन् राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी मदत कक्षाच्या नेत्रदीपक कार्याचे तोंड भरून कौतुक केलं.*रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा* हे ब्रीद कृतीने खरं करून दाखविण्यात कक्ष प्रमुख श्री.मंगेश चिवटेसर व त्यांच्या वैद्यकीय टीमची कठोर मेहनत,सचोटी, सामाजिक बांधिलकी आणि तनमनधनाने केलेल्या कार्याचे फलित आहे,असे उदगार शिंदेसाहेबांनी याप्रसंगी काढले.याशिवाय डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या माध्यमातून राज्यात जेथे जेथे रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे,तेथे तेथे सुमारे १०० रुग्णवाहिका वाटण्यात आल्या.त्याचप्रमाणे धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिरे आयोजित करून गोळा केलेला रक्तसाठा हा मोठमोठ्या आजारांच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे.त्यातून ह्या रुग्णांना सुदृढ व निरोगी जीवन जगण्याची संधी मिळत आहे. खरं तर,ह्या पेक्षा मोठं पुण्यकर्म नाही,अशा भावना भाईंनी यावेळी व्यक्त केल्या.मदत कक्षाच्या रुग्ण सेवेची व्याप्ती वाढत चालली आहे,यासाठी मी मंगेश चिवटे व त्यांच्या कृतीशिल टीमला शुभेच्छा देतो.रुग्णसेवा करताना जात,धर्म,पंत,भाषा,प्रांत न पहाता सच्चा मनाने गरजू रुग्णांना आवश्यक ती सर्व मदत करावी,असे शिंदेसाहेबांनी यावेळी आवाहन केलं.
Tags
news
