एरंडोल येथे निशुल्क सात दिवसीय योग साधना शिबिरचे उद्घाटन



 


 (कृष्णा अरुण महाजन ,एरंडोल तालुका प्रतिनिधी)यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या अंतर्गत योग शिक्षक डिप्लोमा या अभ्यासक्रमासाठी ,एरंडोल येथील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल मध्ये आज सकाळी निशुल्क सात दिवसीय योग साधना शिबिराचे उद्घाटन,प्रतिमापूजन व माल्यार्पण शाळेचे प्रिन्सिपल सुरेखा पाटील मॅडम यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी असिस्टंट प्राध्यापक ज्योती वाघ मॅडम (सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी, जळगाव) या प्रमुख पाहुणे म्हणून तर योग शिक्षक देवयानी महाजन, कृष्णा महाजन,तसेच  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. शिबिरा प्रसंगी योगशिक्षक देवयानी महाजन, प्रमुख पाहुण्या प्राध्यापक ज्योती वाघ व अध्यक्ष सुरेखा पाटील मॅडम यांनी योग साधना चे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सदर योग साधना शिबिर 27 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने