पतीच्या आत्महत्येनंतर दुसऱ्या दिवशी २२ वर्षीय पत्नीने माहेरी बलकुवे येथे माहेरी घेतली गळफास शिरपूर / प्रतिनिधी-




तालुक्यातील बलकुवे येथे २२ वर्षीय विवाहितेने २० फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुनीता विजय भिल रा. बोराडी हल्ली मुक्काम बलकुवे येथे घडली आहे. आत्महत्या केलेल्या विवाहितेचे पती विजय सुखदेव भिल याने १८ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास बोराडी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यांनतर दुसऱ्या दिवशी पत्नी सुनीता विजय भिल हिने माहेरी बलकुवे

येथे २० फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास व्यंकट पाटील यांच्या शेतातील बांधावर लिंबाच्या झाडाला कापडाच्या साहाय्याने गळफास घेतलेले स्थितीत मृतदेह बकन्या चारणा-या लोकांना दिसून आल्याने उघडकीस आले आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय संदीप मुरकुटे, महिला पीएसआय छाया पाटील, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक जी डीं पावरा, पोना गणेश सोनवणे, राजेंद्र एंडाईत पोकॉ चंपालाल पावरा यांनी भेट दिली असता बलकु वे

शिवारातील घटनास्थळी लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत लटकलेला आढळून आल्याने खाली उतरवून नातेवाईक किरण सुभाष भिल याने रात्री साडे वाजेच्या सुमारास शहरातील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला डॉ. हिरेन पवार यांनी तपासणी करून मयत घोषित केले याप्रकरणी वार्डबॉय लखन भुसिंगे यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जी डी पावरा करीत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने