जेसीबी चालकाच्या दुर्लक्षामुळे ट्रॉलीत बसलेल्या व्यक्ती चा मृत्यू नांदुरा तालुक्यातील घटना मलकापूर - उमेश ईटणारे



टिप्परच्या ट्रॉलीत बसलेल्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करत चालकाने जेसीबीने माती भरली . यात ट्रॉलीत बसलेला व्यक्ती मातीखाली दबून मृत्यूमुखी पडल्याची विचित्र घटना ६ फेब्रुवारीला दुपारी तीनच्या सुमारास नारखेड ( ता . नांदुरा ) शिवारातील इंगळे यांच्या वीट भट्टी परिसरात घडली .
कैलास रमेश धरमकार ( ३८ , रा . इच्छापूर ) असे मृतकाचे नाव आहे . मारोती गोपाळ धरमकार ( ५० , रा . गोपाळनगर खामगाव ) यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात टिप्पर आणि जेसीबी चालकाविरुद्ध तक्रार दिली . काल , ६ फेब्रुवारीला त्यांचा पुतण्या कैलास हा टिप्परमध्ये ( क्र . एमएच २८ बीबी ४२ ९९ ) इच्छापूरला जाण्यासाठी बसला होता .इच्छापूरला गेल्यानंतर जेसीबी चालक देविदास ( पूर्ण नाव कळू शकले नाही . ) याने जेसीबीच्या सहाय्याने टिप्परमध्ये माती भरली . पण ट्रॉलीत कोणी आहे किंवा नाही , याची खात्री त्याने केली नाही . टिप्परचालक गजानन सुरेश धोटे ( रा . निमगाव ) यानेही त्याला काही सांगितले नाही . त्यामुळे मातीखाली दबून कैलासचा मृत्यू झाला होता . या विचित्र घटनेचा तपास पोलीस नाईक गजानन इंगळे करत आहेत .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने