*दोंडाईचा शहरात ई-श्रम, श्रमिक (UAN) कार्ड वाटप व नोंदणी सुरू करण्यात आली*




दोडाईचा (अख्तर शाह)
 देशातील असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकारने ई-श्रम कार्ड योजना जाहीर केली आहे.  असंघटित कामगारांसाठी *ई-श्रम कार्ड योजना कॅम्प माजी मंत्री डाॅ.हेमंतराव देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त मा.शिक्षण सभापती नाजीम शेख,यांनी   व* *कार्यकर्त्यांनीं आयोजित केले, ई-श्रम श्रमिक  (UAN ) कार्डं २६जानेवारी गणतंत्र दिवशी  डाॅ हेमंतराव देशमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून. माजी नगराध्यक्ष प्रदिप वाणी,माजी नगराध्यक्ष रविंद्र देशमुख,माजी नगरसेवक गिरधरलाल रामरख्या     ज्यांचा कडुन मोफत कार्डं देण्यात येत आहे , 
तसेच यावेळी उपस्थित युवक कांग्रेस चे प्रदेश सचिव राहुल माणिक,पत्रकार जे.पी नाना, अँड प्रमोद मराठे,जितेंद्र गिरासे हाजी शकुर लोहार, घनश्याम राजपूत, रमेश बोरसे, अमर मराठे,हाजी हबीब बागवान,मोहसिन खान कल्लु, हाजी गफ्फार बागवान,गुलाब शाह, हनीफ शाह, जलील मनियार, ईतर मान्यवर उपस्थित होते, 
मनोगत व योजना ची माहिती मा.शिक्षण सभापती नाजीम शेख यांनी सांगितले की हि योजना असंघटीत कामगार (उदाहरणार्थ:  रस्त्यावर विक्रेते, शेतमजुर,बांधकाम क्षेत्रातील कामगार, हातमाग कामगार, मध्यान्ह भोजन कामगार, रिक्षाचालक, किंवा ऑटो व्हीलर म्हणून काम करणारे ,सुतार,मच्छीमार, प्लंबर, पेंटर,ईलेक्टीशियन ई.) यांच्या करीता आहे, 
माजी मंत्री हेमंतराव देशमुख म्हणाले की
प्रत्येक असंघटीत कामगार पर्यंत ई- श्रम कार्ड योजना पोहोचवण्याचे काम  दोंडाईचा शहरात  आम्ही   करणार आहे, अशी माहिती माजी मंत्री डाॅ.हेमंतराव देशमुख,यांनी दिली.
डाॅ.देशमुख  म्हणाले, देशात आजपर्यंत असंघटित कामगारांची गणना झालेली नाही. त्यांची नेमकी संख्या किती, याची नोंद सरकारकडे नाही. मोठा कामगार वर्ग आजपर्यंत सरकारी योजनांपासून वंचित राहिला आहे. या कामगारांची नोंदणी करून त्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळावा आणि समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी केंद्र सरकारने नुकतीच ई-श्रम कार्ड ही योजना संपूर्ण देशात राबविण्याचे जाहीर केले आहे. या योजनेचे अनेक लाभ व फायदे कामगारांना मिळणार आहेत. स्वयंरोजगारासाठी वित्तसहाय्य, मुलांच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य, सुरक्षा विमा यासारख्या विविध गोष्टींचा लाभ या योजनेच्या माध्यमातून श्रमजीवी कामगारांना मिळणार आहे. महाराष्ट्रात सर्व क्षेत्रातील असंघटित कामगारांना ई-श्रम कार्ड योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. एकही श्रमजीवी या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी दोंडाईचा शहरात कामगारांची नोंदणी आणि मार्गदर्शन अभियान आम्ही  राबविणार आहे.
तीन शे लोंकाना कार्ड वाटप करण्यात आले,ई-श्रम कार्डं नोंदणी करीता शहरातील असंघटीत कामगारचे  भरपुर प्रतिसाद मिळत आहे, 
अश्पाक मन्यार,दगा पेंटर शाह, भैय्या ड्रायव्हर,मोहसिन सिराजोद्दीन शेख,  शरीफ मैताब शेख, आजम शेख, गड्डु शेख,समद शेख,  युसूफ शेख, ईमरान बागवान, अजहर सलीमोद्दीन शेख, अरबाज शेख, मोईन नाजीम शेख,दानिश शेख, आवेस शेख, अदनान मन्यार,अजीज शाह,जाकीर मंसुरी, फयाज मन्यार,यांनी परिश्रम घेतले, 
 नाजीम शेख यांनी आभार मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने