केव्हीपी जातोडा विद्यालयाच्या स्कुल कमिटी चेअरमन पदी श्री उदेसिंग राजपूत यांची निवड* *शिरपूर तालुका सरपंच महासंघ तर्फे सत्कार*




शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील जातोडा येथील किसान विद्या प्रसारक संस्था संचलित महात्मा फुले व डॉ आंबेडकर स्मृती विद्यालयाच्या स्थानिक स्कुल कमिटीच्या चेअरमनपदी गावातील माजी उपसरपंच तथा रंधे परिवाराचे विश्वासू आण्णासो श्री उदेसिंग भटेसिंग राजपूत यांची निवड करण्यात आली.

श्री राजपूत यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषारभाऊ रंधे, सचिव श्री निशांतनाना रंधे, खजिनदार श्रीमती आशाताई रंधे, भाजपा माजी तालुकाध्यक्ष श्री राहुलआबा रंधे, नगरसेवक श्री रोहितबाबा रंधे, श्री शशांक रंधे, परिसरातील राजकीय व सामाजिक स्थरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. 
 
श्री उदेसिंग राजपूत हे परिसरातील सामाजिक कार्यात हिरहिरीने सहभाग घेतात. निस्वार्थी व्यक्तिमत्व, मनात कुठलाही छलकपट नाही, सर्वसामान्यांच्या दुःखात तत्परतेने सहभागी होणारे *श्री राजपूत यांच्या निवडीबद्दल शिरपूर तालुका सरपंच महासंघ तर्फे तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.* 

यावेळी जातोडा माजी उपसरपंच जयसिंग राजपूत, बोरगाव येथील दीपक राजपूत, रविंद्र भिकेसिंग राजपूत, राजू इंद्रसिंग राजपूत, अनिल धनगर व बोरगाव-जातोडा ग्रामस्थ उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने