रत्नागिरी शिक्षणाधिका-याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल*




रत्नागिरी:डाॅ.गजानन पाटील प्रभारी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्यावर अनुसूचित जमाती व जाती अत्याचार प्रतिबंधक  (अॅस्ट्रासिटी )सुधारित कायद्यानुसार व सायबर क्राईम कायद्यानुसार  फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंबंधीची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दिनांक 22 जानेवारी 2022 दुपारी 2 वाजता दाखल करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी दोषी व बोगस  अधिका-यांवर कारवाई व 2 मूळ कागदपत्रे दोन लाख दंडाच्या रकमेसह परत करा अशा मागण्यासाठी आपण जिल्हा परिषद रत्नागिरी येथे 200 वे उपोषण करणार आहोत,असे निवेदन शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी दापोलीच्या गटशिक्षणाधिकारी मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना पाठविले होते.त्या पत्राला अनुसरून डाॅ.गजानन पाटील प्रभारी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी त्यांच्या सहीने दिनांक 22 जानेवारी रोजी उपोषण कर्ते शिक्षक सुशिलकुमार पावरा यांना पत्र पाठवले. शिक्षणाधिकारी यांच्या पत्रात आक्षेपार्ह खोटा व चूकीचा तसेच धमकीचे शब्दप्रयोग केलेला मजकूर लिहिलेला आढळला. आक्षेपार्ह पत्र मिळताच तक्रारदार सुशिलकुमार पावरा यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली व पोलीस अधिका-यांना सगळी हकीकत सांगून तक्रार दाखल केली आहे. 
                    तक्रारीत म्हटले आहे की, मी  सुशिलकुमार जहांगीर पावरा,गोल्ड व्हॅली पांगारवाडी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथे माझ्या परिवारासह राहतो. बिरसा फायटर्स या आदिवासी सामाजिक संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी काम करतो.आदिवासी समाजात माझी चांगली ओळख आहे.मला सामाजिक श्रेत्रात उत्कृष्ट कामाबद्धल  इंटरनॅशनल आयडॉल अवार्ड 2021 च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय कला मित्र, समाज भूषण,आदिवासी रत्न इत्यादी विविध  पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे.  संदर्भ पत्रान्वये  डाॅ.गजानन पाटील प्रभारी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी मला धमकीचे शब्दप्रयोग करीत दबाव आणून  माझी नाहक बदनामी केली आहे.डाॅ. गजानन पाटील यांच्या दिनांक 21/01/2022 रोजीच्या पत्रात चूकीच्या , खोट्या  आणि धमकीबाबतच्या बाबी लिहण्यात आल्या आहेत. सदर पत्रात माझ्यावर ठेवण्यात आलेले दोषारोप सिद्ध झाले आहेत असा चुकीचा व अपूर्ण माहितीचा मजकूर  लिहण्यात आला आहे.कारण माझ्या वर ठेवण्यात आलेले सर्वच्या सर्व दोषारोप सिद्ध झाले नाहीत.कारण सुरवातीचे 4 मुद्दे हे न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित आहेत.ते सिद्ध झाले नाहीत. असे असताना गजानन पाटील यांनी माझी समाजात बदनामी करण्याच्या दूषित हेतुने दोषारोप सिद्ध झाल्याचे खोटे लिहिले आहे.सदर पत्र त्यांनी मा.जिल्हाधिकारी रत्नागिरी, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी,पोलीस अधिक्षक रत्नागिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती दापोली  इत्यादींना पाठवून माझ्या बद्दल चूकीची माहिती देऊन  गैरसमज पसरविण्याचे षडयंत्र केले आहे. त्यामुळे मला प्रचंड शारिरीक आणि मानसिक त्रास झालेला आहे. तसेच पत्राद्वारे धमकीचे शब्दप्रयोग करून मला धमकावले आहे व माझ्या वर दबाव तंत्राचा वापर केला आहे. तसेच रत्नागिरी जिल्हा  परिषदेकडे आपले कोणतेही हक्क संबंध उरत नाहीत, असे जाणीवपूर्वक लिहिले आहे. महोदय, मी जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदर शाळेतील उपशिक्षक असून माझा विषय व सगळ्यां मागण्या ह्या जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित आहेत. माझे 200 वे उपोषण हे सुद्धा जिल्हा परिषद रत्नागिरी प्रशासनासंबंधीतच आहे.माझी उर्वरित 2 मूळ कागदपत्रे दोन लाख दंडाच्या रकमेसह मला परत करणे,हे जिल्हा परिषद रत्नागिरी  प्रशासनाचे काम आहे.तसेच माझ्या सगळ्या मागण्या ह्या जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधितच आहेत. डाॅ. गजानन पाटील यांनी दिनांक 22/01/2022 रोजी कार्यालयाला सुट्टी असताना सुद्धा दूषित हेतुने  आपला माणूस माझ्या घरी पाठवून सदर पत्रा द्वारे धमकी दाखवत माझ्यावर दबाव आणला आहे.माझे मानसिक व शारीरिक खच्चीकरण केले आहे. 
             या प्रकरणात  विजय धोंडू जाधव  यांनी सुद्धा चुकीची व बदनामी कारक माहिती लिहल्याबद्धल चौकशी होऊन  पोलीस ठाणे खेड येथे आरोपी विजय धोंडू जाधव यांच्यावर  फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वृत्तपत्रातील बातम्या व टिव्ही बातम्यांद्वारे प्रकरणाविषयी वारंवार  माहिती असताना व एक सुशिक्षित,  जबाबदार अधिकारी पदावर असताना     पुन्हा डाॅ. गजानन पाटील शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी माझी बदनामी करण्याच्या दूषित हेतुनेच जाणीवपूर्वक बदनामीकारक  मजकूर लिहलेला आहे. 
                   दोषी  भ्रष्टाचारी, षडयंत्रकारी,बोगस अपंग प्रमाणपत्र धारी विजय दाजी बाईत तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली, बोगस डिग्री धारक ,दोषी नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली, 31 दोषारोपीत एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक रत्नागिरी यांना सेवेतून बडतर्फ करा व माझी 2 मूळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा व माझ्या 28 मागण्यांची तात्काळ पूर्तता करा,असा माझा उपोषणाचा विषय आहे. परंतु उपोषणाचा विषय बाजूलाच ठेवत डाॅ.गजानन पाटील प्रभारी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी माझ्या बद्दल चुकीची व अपूर्ण माहितीचा मजकूर लिहून वरिष्ठांकडे  गैरसमज पसरविण्याचे काम केले आहे  म्हणून त्यांच्या वर सायबर क्राईम कायद्यानुसार व अॅस्ट्रासिटी कायद्यानुसार  गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी पोलीस ठाण्यात केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने