शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे प्र.न. ग्रामपंचायत सरपंचांनी विना निधी विकासकामांचा एक नवीन आदर्श निर्माण केला*




 दोडाईचा (अख्तर शाह)
शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे प्र.न. हे गाव स्वातंत्र्य चळवळीत  जिल्ह्यात अग्रेसर होते येथील घरात घरात स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी साळवे येथे इंग्रजांचा खजिना लुटण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती त्याकाळी अनेक स्वातंत्र्य सैनिकांचा तांब्रे पत्र देऊन सत्कार करण्यात आला होता पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या गावाचा विकास पाहिजे तसा झालेला दिसून येत नाही त्यात चूक पुढाऱ्यांची की प्रशासनाची हा अभ्यासक विषय आहे.
आज महत्वाचे म्हणजे येथील नवनिर्वाचित सरपंच श्री.रजेसिंग प्रतापसिंग गिरासे हे निवृत्त माध्यमिक शिक्षक आहेत गेल्या मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पदावर बसले त्यावेळी पॅनल प्रमुख म्हणून त्यांचे चिरंजीव दिपक रजेसिंग गिरासे हे सध्या राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख आहेत यांनी नऊ सदस्यांचे अपक्ष पॅनल उभे केले होते व भाजपाचे सत्ताधारी पॅनलचां धुव्वा उडाला होता अपक्ष पॅनल असूनही नऊपैकी आठ सदस्य दीपक गिरासे यांनी त्यांच्या साथीदारांच्या मेहनतीने विनाखर्च निवडून आणले व सर्व गावाने ही त्यांना बहुमत देत साथ दिली व बिनविरोध सरपंच त्यांचे पिताश्री रजेसिंग गिरासे यांना बसविले. पदभार स्वीकारल्यानंतर काही महिन्यात कोरणाचे पुन्हा संकट आले म्हणून ग्रामपंचायतला निधीची अडचण आली अनेक वेळेस पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल स्थानिक जिल्हा पुढाऱ्यांना व प्रशासनाला पत्र व्यवहार केलीत पण जिल्हा परिषद भाजप सत्ताधारी पक्षाची आहे म्हणून भाजप पक्षाची ग्रामपंचायत नसल्यामुळे त्यांचा विचार कोणी केला नाही व एकही काम वर्षभरातून त्यांना मिळाले नाही त्या कारणामुळे विद्यमान सरपंच रजेसिंग गिरासे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत गटनेते इंजि. दीपक गिरासे यांनी जनतेतून लोक निधी उभी करण्याची संकल्पना घेतली व सुरवात केली आणि स्वतः मोठी देणगी देत त्यांच्या स्वर्ग. आईसाहेब मीनाताई रजेसिंग गिरासे यांच्या स्मरणार्थ त्यांनी अमरधाम सुशोभीकरण सह प्रवेश गेट बनविणे, कंपाउंड करणे, अमरधाम परिसर स्वच्छ करणे, सर्व कामांची डागडुजी करून झालेल्या कामाला सुंदर रंगरंगोटी केली.
तसेच जिल्हा परिषद मराठी शाळेला ही दीपक गिरासे यांनी स्व:खर्चचित व ग्रामपंचायत १५ वित्त आयोगाच्या निधीची  काही मदत घेत काही विकास कामे करून दाखवलीत सर्व शाळा व परिसर रिपेरिंग करत डिजिटल केली. व पुढे ग्रामपंचायतीची मोफत सेमी इंग्लिश स्कूल सुरू करणार आहेत गिरासे स्वतः जयदीप नॉलेज कॅम्प, देगाव शैक्षणिक संस्थेचे चेअरमन आहेत म्हणून त्यांनी स्वतःचा अभ्यासू अनुभव व तांत्रिक शिक्षणाचा फायदा आपल्या गावाच्या शाळेला असो या प्रत्येक विकास कामाला असो ते आज करीत आहेत येथील शाळा व अमरधाम परिसर व गाव परिसरात आज सर्व कामे त्यांच्या प्लॅनिंग होतांना सुंदर दिसत आहेत.
अनेक वर्षापासून गावातील मध्यभागी ठिकाणी एक खूप मोठी जागा काटेरी झुडप्यांनी घेरलेली होती तेथे कायमस्वरूपी गटारीचे पाणी व अस्वच्छ परिसर राहत होता. आता ती जागा स्वच्छ करत तिथे अंडरग्राउंड गटारीचे काम करून तिथे भव्य मोठे छत्रपती शिवाजी स्मारक व बाल उद्यान उभे करण्याचे काम सुरू आहे तेही कुठलीही शासकीय निधी न घेता स्वतःच्या खर्चातून व काही लोकवर्गणीतून काम सुरू आहेत. व यापुढे प्रधानमंत्री आवास योजनेतील शेकडो घरकुल ते स्वतः प्लॅनिंग नुसार ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक सुंदर सुटसुटीत कॉलनी परिसरा नुसार बांधकाम करणार आहेत व त्यांचे वाटप मंजूर यादीनुसार करणार असा सुंदर संकल्प त्यांचा आहे.
अनेक वर्षापासून गावा परिसर चा भाग काटेरी झुडप्यानी घेरलेला होता स्वतःचे जेसीबी मशीन घेत सर्व गाव परिसराचा भाग त्यांनी स्वच्छ केला, सर्व गटारी नाले स्वच्छ केली, पिण्याची पाण्याची गाव विहिरीला पाणी साठा मोबलक मिळावा म्हणून त्या विहिरीला लागून तलाव खोलीकरण केले, गावात येणारे प्रमुख रस्ते यांच्यावर मोठ्या प्रमाणात बाबूळ व काटेरी झुडपेमुळे अरुंद झालेला होता म्हणून गावात येतांना अनेक लोकांना अडचण निर्माण होत होती , गाडी त्या रस्त्यातून निघत नव्हती सरपंच वडिलांच्या मार्गदर्शनाने दिपक गिरासे यांनी स्व:खर्चात सर्व रस्ते साफ केलीत व काही नवीन रस्ते बजेट काँक्रिटीकरण मधून केलीत. असे अनेक काम पुढे त्यांचे प्रस्तावित आहेत व तसा पाच वर्ष कार्यकाळाचा नियोजित प्लॅन त्यांनी स्वतः तयार करून टप्प्याटप्प्यांनी कामे करीत आहेत. अनेक नवीन नवीन संकल्पना व आदर्श विकास कामे आणि त्यांचे आर्थिक उपाय योजना ते नेहमी शोधत असतात व ते पूर्ण करण्यासाठी स्वतः उभे राहून वेळ देत काम करून घेतात. अवघ्या वयाच्या ३४ व्या वर्षात दीपक गिरासे यांना बांधकाम क्षेत्रातला व शैक्षणिक क्षेत्रातला तसेच राजकीय क्षेत्रातला खूप मोठा अनुभव त्यांना आहे यावरून दिसून येत आहे.
त्यामुळे त्यांच्या परिसरात व गावातील ग्रामस्थांमध्ये त्यांच्याविषयी कौतुक केले जाते, तसेच जनतेमध्ये समाधान कारक व आनंदी वातावरण त्यांनी करून दाखविले.
असे विकासशील सरपंच व अभ्यासू गटनेता दीपक गिरासे तरुणसारखा प्रत्येक गावाला मिळाला तर प्रत्येक गावात विकास झाल्याशिवाय राहणार नाही.
दलवाडे येथील सरपंच यांचा आदर्श सर्व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी घेतला तर निश्चितच विकास त्यांना साध्य करता येईल यात शंका नाही..

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने