सप्तशृंगी गड सोमनाथ मानकर.
सप्तशृंगी गड=साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ
श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड आई सप्तशृंगी मातेची नवरात्र प्रारंभ दहा जानेवारी पासुन सुरुवात झालीआहे दिनांक 17 तारखेपर्यंत पौर्णिमेनिमित्त वेगळ्या प्रकारच्या दररोजच्या आरस करण्यात आलेले आहेत
अकराशे किलो फळाची एक विशिष्ट प्रकारची आरास सप्तसुंगी मंदिरांमध्ये नाशिकरोड येथील अध्यात्मिक गुरु गजानन कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व भक्त विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली गजानन प्रेम सत्संग ग्रुप व राधे-राधे सोशल ग्रुप पचविस सदस्यांनी ऐकत्र येत ही सजावट करण्यात आलेली आहे
शाकंभरी नवरात्र उत्सवानिमित्त सप्तशृंगी मातेच्या मंदिरामध्ये अकराशे किलो फळांची सजावट करण्यात आली आहे
सफरचंद संत्री मोसंबी अननस द्राक्षे बोर डाळिंब केळी पेरू टरबूज ऊस आंबे मोरपीस असे अनेक फळे वापरून सजावट करण्यात आले आहे
शाकंभरी नवरात्र उत्सव उद्या संपल्यानंतर सर्व भाविकांना ही फळे प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे
आज पर्यंत सप्तशृंगी मातेच्या मंदिराला अनेक प्रकारच्या फुलांनी सजावट करण्यात आली होती परंतु सप्तशृंगगडावर फळांची सजावट पहिल्या वेळेस करण्यात आली आहे
शाकभरी नवरात्र उत्सव प्रारंभ होऊन सुद्धा कोरोण्याच्या पार्श्वभूमीवर ती कडक निर्बंध लाधल्यामुळे सप्तशृंगी गडावर ती भाविकांची वर्दळ कमी झाली आहे
Tags
news
