धुळे- उत्तर महाराष्ट्र पोल्ट्री व्यावसायिक असोसिएशनची आज वार्षिक बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात करण्यात आली.तसेच विविध मागण्यांसंदर्भात पोल्ट्री व्यवसायिकांच्या मागण्यासंदर्भात आवाज शासन दरबारी पोचावा यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन देखील करण्यात आले होते.
या बैठकीला उत्तर महाराष्ट्र पोल्ट्री व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष विशाल ठाकूर, उपाध्यक्ष शशिकांत तिसगे, सचिव मयूर सनेर, तसेच असोसिएशनचे डॉक्टर प्रदीप पवार, उमेश कुवर,कैलास पंजाबी, मनोज बिरारी, तसेच धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील आदी प्रमुख मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
या बैठकीत सोया डीओशी, ग्राउंडनट डीओशी, आणि पोल्ट्री व्यावसायांना लागणारे औषधावरील Gst काढण्यात यावी,तसेच विलेज प्रोपर्टी टॅक्स , काढण्यात यावा तसेच शाळांमध्ये पोषक आहार म्हणून अंडे सुरू करण्यात यावी मक्यावरील दर निश्चित करूनच पोल्ट्री व्यावसायिकांना देण्यात यावा अशा मागण्या यावेळी पत्रकार परिषदेतून करण्यात आल्या आहेत...
कोरोनाच्या भीषण अशा परिस्थितीत पोल्ट्री व्यवसायकांवर काही अफ़वामुळे संकट निर्माण झाले होते त्यातून पोल्ट्री व्यवसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला होता.तसाच कर्जाचा डोंगरही पोल्ट्री व्यावसायिकांच्या
डोळ्यासमोर दिसत होता..
त्यामुळे शासन प्रशासनाने पोल्ट्री व्यवसाय संदर्भात विशेष जनजागृती करून होणाऱ्या अफवांवर आळा घालावा
तसेच चिकन व अंडी आहारासाठी पोषक असून आहारात घेण्यात यावे असे आवाहन देखील पोल्ट्री व्यवसाय असोसिएशन चे अध्यक्ष विशाल ठाकूर यांनी केल आहे...
याबाबत अधिक माहिती उपस्थित प्रमुख मान्यवरांनी दिली आहे..
Tags
news
