शिरपूर प्रतिनिधी - तालुक्यात काल दिनांक 7 जानेवारी रोजी संध्याकाळी 4:30 वाजता झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. झालेल्या गारपिटीमुळे शेतातील वार्षिक पिके, रब्बी पिके तसेच टेंभे- रुदावली याठिकाणी घरांची देखील पडझड झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
आज (8जानेवारी) आमदार श्री काशिराम पावरा व जि प सदस्य श्री भरत पाटील यांनी तात्काळ नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली तसेच तहसिलदार श्री आबा महाजन यांना भेटून प्रशासनाने योग्य ती दखल घेण्याच्या व तात्काळ पंचनामे करण्याचे सूचना केल्यात. आमदार पावरा यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरांच्या भेट घेतल्या व शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली
यावेळी वनावल गटाचे जिल्हा परिषद सदस्य भरत भिलाजी पाटील, जातोडा गण पं स सदस्य निंबा पाटील, मा पं स उपसभापती जगतसिंग राजपूत, सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, जातोडा सरपंच रावसाहेब धनगर, उपसरपंच दर्यावसिंग राजपूत, टेंभे सरपंच देवा जीभाऊ राजपूत, सोसायटी चेअरमन बकता तात्या राजपूत, रविंद्र केसरसिंग राजपूत, माजी सरपंच भटेसिंग राजपूत, जयसिंग राजपूत, मोहन राजपूत, राजू राजपूत, चांदपुरी येथील लिलाचंद पटेल तसेच भरवाडे, टेंभे, वनावल, रुदावली, जातोडा, बोरगाव परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
Tags
news
