तुकाराम झांबरे यांचेवर बारामती येथे अंत्यसंस्कार - मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण प्रतिनिधी दत्ता पारेकर




    पुणे:जुन्या पिढीतील बागातदार व प्रसिद्ध आडत व्यवसायिक तुकाराम (बापू) दादासाहेब झांबरे (मळद ) यांचे पार्थिवावर रविवारी (दि. 23) बारामती येथे शोकाकुल वातावरणात  अंत्यसंस्कार करण्यात आले. तुकाराम झांबरे यांचे वृद्धापकाळाने शनिवारी (दि.22) रात्री बारामती येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते 87 वर्षांचे होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे ते सासरे होत.
            तुकाराम (बापू ) झांबरे यांचे व्यक्तिमत्त्व करारी व संयमी होते. आयुष्यभर त्यांनी शेतकरी व नागरिकांना मदत केली. त्यांचे पाठीमागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. इंदापूर तालुका जिजाऊ महिला बचत गट फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील तसेच उद्योजक सुनील झांबरे व अनिल झांबरे यांचे ते वडील होत. बारामती येथे अंत्यसंस्कार प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने