शिरपूर सुरक्षारक्षकांनी जपला माणुसकीचा वसा सोने चांदीचे दागिणे व रोख रुपये नवविवाहीत दाम्पत्यांना परत




शिरपूर - शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सीमा तपासणी नाका येथील सुरक्षारक्षकांनी माणुसकीच्या वसा जपला असून आपली प्रामाणिकता दाखवा त्यांना आढळून आलेल्या पर्समधील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम त्यांनी पोलिसांना परत परत केले व पोलिसांच्या माध्यमातून ते मूळ मालकांना हस्तगत करण्यात आले
दिनांक २३/०१/२०२२ रोजी दुपारी १३.०० वाजे चे सुमारास नवविवाहीत दाम्पत्य नामे आकीब मुख्तार मंसुरी वय २५ व २) आसमा आकीब मन्सुरी वय २२ दोन्ही रा. देवपुर धुळे एकविरा मंदीरा जवळ अमरधाम रोड, हे धुळे कडुन सेंधवा कडे त्यांची मोटर सायकल  ने जात होते. त्यांच्या मोटार सायकलला त्यांची पर्स लावलेली होती. ते हाडाखेड सिमा तपासणी नाका येथे आल्यावर त्यांची  वरील पर्स खाली पडली. ते पुढे निघुन गेले ते पर्स सुरक्षा रक्षक १) महारु भास्कर पाटील, २) योगेश सामेनाथ अढकमल ३) कृष्णा कैलास माळी ४) मयुर ज्ञानेश्वर साळुंखे यांनी उचलली सदर पर्स मधे सोने चांदीचे दागिणे, त्यात ०२ तोळा वजनाचे नेकलेस, ०७ ग्रॅम वजनाची रिंग, १.५ ग्रॅम ची नथनी, १० ग्रॅम चा ब्रेसलेट, १.९ ग्रॅम नथ, ३ ग्रॅमची अंगठी तसेच रोख १०००/- रुपये असे एकुण किंमत १,७२,७००/- चे होते. वर नमुद नवविवाहीत दाम्पत्य पर्स शोधत त्यांचे जवळ आल्यावर सुरक्षा रक्षकांनी सदर नवविवाहीत दाम्पत्य व पर्स पोलीस स्टेशनला हजर केले. पोलीस स्टेशनला पोसई श्री भिकाजी पाटील व पो. असई नियाज शेख यांनी सपोनि श्री शिरसाठ, पोसई खैरनार यांचे मार्गदर्शनाखाली घाबरलेल्या परिस्थतीत असलेल्या नवविवाहीत दाम्पत्य धीर देवुन त्यांचे सात्वन करुन सदर सोने चांदीचे दागिणे व रोख रुपये ची खात्री करुन त्यांना ते परत केले आहे. तसेच सुरक्षा रक्षकांच्या या चमकदार कामगीरीचे कौतुक करुन त्यांना शाबाशकी दिली आहे. सुरक्षा

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने