शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद मराठी शाळेत समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश वाटप करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि प सदस्या श्रीमती अभिलाषा भरत पाटील, पं स समिती सदस्य श्री निंबा पाटील, उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, शालेय समिती अध्यक्ष राजू भिल, ग्रा पं सदस्य श्री दीपक राजपूत, माजी उपसरपंच रजेसिंग राजपूत, ज्येष्ठ ग्रामस्थ विठ्ठल झुलाल कोळी, गुलाब फुला भिल, देविदास धनगर, पिरन येशी उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात पं स सदस्य श्री निंबादादा पाटील यांनी सांगितले की गावातील मराठी शाळेत विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणातील सर्व गोष्टी शिकविल्या गेल्या पाहिजे म्हणजे माध्यमिक शाळेत जातांना त्यांना अडचण यायला नको. तसेच शाळेबाबतची कुठलीही मदत लागल्यास शिक्षकांनी निसंकोच पणे सांगावे अशा सूचना श्री पाटील यांनी केल्या. यावेळी शिरपूर तालुका सरपंच महासंघ अध्यक्ष तथा गावाचे उपसरपंच श्री योगेंद्रसिंग सिसोदिया यांनीही आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांनी कोरोना काळात गल्लोगल्ली जाऊन विद्यार्थ्यांना शिकविल्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले.
प्रास्ताविक शिक्षक श्री गणेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्रीमती अनिता जगन्नाथ जाधव यांनी केले.
Tags
news