औरंगाबाद - महाराष्ट्राच्या संभाजीनगर मध्ये स्वाभिमानी महापराक्रमी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून संभाजीनगर महानगरपालिकेला मंजूर झालेल्या जवळपास एक कोटीच्या निधीला स्थानिक AMIM खासदार इम्तियाज जलील यांनी संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांना आपल्या पत्राद्वारे निवेदन देवून विरोध दर्शविला आहे.
मंजूर झालेल्या निधीतून ग्रामीण भागात गरिब विद्यार्थ्यांसाठी सैनिकी शाळा सुरू करण्यात यावी जेणेकरून त्याचा फायदा येथील विद्यार्थ्यांना होईल,महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारून कुणाला काहीच उपयोग होणार नाही असे या पत्रात त्यांनी नमुद केले आहे.
त्यांच्या या पत्रावर व त्यांनी न्यूज चॅनलवर दिलेल्या भाष्यावर केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड,शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत,माजी खासदार शिवसेना उपनेता चंद्रकांत खैरे,संभाजीनगर शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे,महाराष्ट्र करणी सेना प्रदेशाध्यक्ष देविचंद बारवाल,राजपूत संघटना अध्यक्ष ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी कडाडून टीका करत त्यांच्या भाष्यावर जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
स्वाभिमानी महापराक्रमी महाराणा प्रताप आणी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज या देशात जन्माला आले नसते तर देशा बाहेरून आलेल्या दरोडेखोर अल्लाऊद्दीन खिलजी,बाबर,अकबर, औरंगजेबाच्या औलादांनी सर्वांना डोक्यावर गोल टोपी व अंगावर गुरखा घालण्यास भाग पाडले असते.हिंदूहृदयसम्राट धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी इस्लाम धर्म स्विकारावा यासाठी औरंगजेबाने शर्तीचे प्रयत्न केले महाराजांच्या अंगातील प्रत्येक अवयव क्रूरतेने काढले शेवटी स्वाभिमानी व आपल्या हिंदू धर्मावर निस्सीम प्रेम करणारे हिंदूहृदयसम्राट छत्रपती संभाजी महाराज त्याचं काही एक ऐकत नाही हे बघून त्यांचा त्यानी शिरच्छेद केला. यांच्या काळात हिंदूंच्या कित्येक देवी देवतांची मंदिरे उद्धवस्त करण्यात आली,कित्येक महिलांवर पाशवी अत्याचार व बलात्कार केले गेले असा या देशविघातक आक्रमण कारिचा इतिहास आहे.शासनाच्या मंजुर झालेल्या निधीतून हे काय सांगणार सैनिकी शाळा काढा त्यानी त्यांच्या मदरशांना मिळणाऱ्या शासनाच्या निधीतून गावोगावी सैनिकी शाळा नाही तर मोठं मोठे महाविद्यालय काढून दाखवावे जेणेकरून संभाजीनगरच नव्हे तर देशातील गोर गरीब विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल,महाराणा प्रताप हिंदू धर्माचे दैवत आहे यांच्या पुतळ्याला जर विरोध केला तर देशविघातक नीतिमत्ता राष्ट्रपुरुषांच्या हवामान करणाऱ्या जलील तुला तुझी जागा दाखवल्याशिवाय शिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशी प्रखर प्रतिक्रिया करणी सेनेचे प्रदेश प्रवक्ता दिनेशसिंह जाधव यांनी यावेळी दिली आहे. सदरच्या मुद्दा हा वेगाने पेट घेत असून महाराष्ट्र राज्यातील करणी सेना या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे.
Tags
news