लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या शहर संघटक पदी आकाश सोनवणे तर धुळे तालुका उपाध्यक्षपदी मनोहर पाटील यांची नियुक्ती

 




धुळे - महाराष्ट्र राज्य  लोकशाही पत्रकार संघांचे संस्थापक अध्यक्ष  सचिन बोंबले  तसेच राज्य उपाध्यक्ष अमोल पाटील साहेब व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष  दिपक वाघ सर व विभागीय मराठावाडा अध्यक्ष दशरथ सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली  आकाश सोनवणे यांची लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या शहर संघटक पदी निवड झाली आहे.

तर मुकटी येथील मनोहर पाटील यांची धुळे तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.

सदर ही निवड औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रवीण तायडे, व धुळे जिल्हा महासचिव गणेश पवार यांच्या शिफारशी वरून करण्यात आली आहे.


   संघटनेच्या हितासाठी काम करून लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही. व सर्वसामान्य माणसांच्या व पत्रकारांच्या समस्यांवर आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी ग्वाही नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे .....

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने