शहरातील वरवाडे येथे बाबूजी कॉम्प्लेक्समध्ये महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने 6 जानेवारी रोजी ज्येष्ठ पत्रकार सुभाष कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी पत्रकार अशोक श्रीराम,रत्नदीप सिसोदिया,राजेंद्र पाटील,अरूण दलाल,सुरेश कुंवर,विजयसिंह राजपूत व्यासपीठावर प्रमख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. पत्रकार,संपादक,वर्तमानपत्रे, त्यातील बातम्या व लेखांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचत असल्याने त्यांच्या शब्द सक्षम व निर्दोष असतील तर पत्रकाराची प्रभावी प्रतिमा निर्माण होऊन त्याला महत्त्व प्राप्त होत असल्याने सामाजिक व सार्वजनिक मुद्द्यासाठी प्रवाही, ठोस व मुद्देसूद लेखन करीत सातत्य टिकविण्यासाठी पत्रकाराने प्रयत्न करावा असे सांगत प्रत्येक प्रश्नासाठी सर्वांनी एकमेकांना सांभाळून घेत वाटचाल करीत एकत्रित प्रयत्न केल्यास अनेक प्रश्न मार्गी लावणे शक्य होत असल्याबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन करीत पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी राजेंद्र जाधव, राजेश मारवाडी, विजयसिंह राजपूत यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी पत्रकार हेमंत चौधरी यांनी ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा देऊन सन्मानित केले.या कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचलन महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ईश्वर बोरसे यांनी करुन आभार मानले.कार्यक्रमास तालुक्यातील ग्रामीणसह शहरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे सचिव लक्ष्मण गोपाळ, जिल्हा उपाध्यक्ष अंबादास सगरे, तालुकाध्यक्ष हेमंत चौधरी, नितीन जाधव यांनी प्रयत्न केले.
Tags
news
