रोटरी प्री- प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये नववर्षानिमित्त उपक्रम दोडाईचा (अख्तर शाह)



दोडाईचा श्रीमती बसंतीबाई पाबूदानजी संचेती रोटरी प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल येथे नववर्षानिमित्त साप्ताहिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी नववर्षाच्या स्वागतासाठी शिक्षकांच्या मदतीने शालेय परिसर ,वर्ग सजावटीत आनंदाने सहभाग घेतला. विद्यार्थी व शिक्षकांनी यशस्वी व आरोग्यदायी जीवनासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली.    नववर्षारंभी पालकांना सहकार्य करणे, मोठ्यांचा आदर करणे,शाळेचा अभ्यास वेळेवर पूर्ण करण्याचा संकल्प शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतला. चित्र सजावट करून घेऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आला. नववर्षाच्या स्वागतासाठी सर्व विद्यार्थ्यांनी घरूनच लाल रंगाचा पोशाख परिधान करून शालेय गाण्यांवर नृत्य सादर केले.  संगीत खुर्ची, गीतगायन या मनोरंजक खेळातून कार्यक्रमाचा आनंद लुटला . कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू व फुगे देऊन कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन  करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाला आलेल्या प्रमुख अतिथी सौ.हेतल शाह यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर दोन शब्द सांगून विद्यार्थ्यांचे येणारे  २०२३ हे नवीन वर्ष आरोग्यदायी, आनंदमय व सुखमय व यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

शाळेचे अध्यक्ष हिमांशू शाह उपाध्यक्ष डॉ.मुकुंद सोहोनी, डॉ. आशाताई टोंणगावकर यांनी विद्यार्थ्यांना नवीन वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.                  

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंचार्ज बतुल बोहरी व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने