आज दि. ६ जानेवारी रोजी शिंदखेडा तालुक्यातील जयदीप नॉलेज कॅम्प देगाव येथील जुनिअर कॉलेज व आय.टी.आय व कॉलेज च्या विद्यार्थ्यांना लसीकरनाचा पहिला डोस आज देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिंदखेडा विधानसभा क्षेत्र प्रमुख राष्ट्रवादी व जयदीप नॉलेज कॅम्पचे अध्यक्ष मा. दीपक दादा गिरासे होते. त्यांनी या वेळेस आपले मार्गदर्शन करतांना सांगितले की महा विकास आघाडी सरकारच्या माध्यमातून प्रत्येक गावात प्रत्येक घरात प्रत्येक वयाच्या व्यक्तींना वेळेत लसीकरण होणे यासाठी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी गल्लीपर्यंत लसीकरण मोहीम तिसऱ्या टप्प्यात यशस्वीरित्या सुरू आहे. म्हणून या परिसरातील विद्यार्थी वयोगट १५ ते १८ या तरुणांना व तरुणींना लसीकरण व्हावे या उद्देशाने आज आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता व तो यशस्वी होतांना दिसत आहे, आपल्या आजूबाजूला कोणाचं लसीकरण राहिले असेल तरी त्यांनीही लवकरात लवकर आपले लसीकरण करून घ्यावे कारण कोरणा ची तिसरी लाट येण्याची सुरुवात झाली आहे कोणाच्या जीवाला धोका होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने ठेवणं तेवढेच गरजेचे आहे गेल्या कोरोना काळात आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांना वाचवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली ते डॉक्टर्स, नर्स, आशा, तसेच पोलीस यंत्रणेचे त्यांनी यावेळी आभारी मानले. कार्यक्रमाप्रसंगी आशा वर्कर व कॅम्पसचे टीचर स्टाफ उपस्थित होते
जयदीप नॉलेज कॅम्प देगाव येथे कॉलेज विद्यार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आले. दोडाईचा (अख्तर शाह)
byMahendra Rajput
-
0