होळनांथे येथे भीक मागितल्याचा रागातून भिक्षुकाचा खून,थाळनेर पोलिसांन कडून संशयितास अटक





होळनांथे - दारासमोर उभे राहून भीक मागितल्याचा राग आल्याने मारहाण करीत भिक्षुकाचा खून केल्याची घटना तालुक्यातील होळनांथे लगत असलेल्या  अमरीशनगर मध्ये शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.याप्रकरणी थाळनेर।पोलिसांनी संशयित मारेकऱ्यास अटक केली आहे.चैन्या आरश्या पावरा वय ५५, रा.अमरीशनगर असे मृताचे नाव आहे. 
          मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चैन्या आरश्या पावरा हा अविवाहित असून,गावात भीक मागून उदरनिर्वाह करीत होता.चैन्या पावरा हा गुरुवारी ६ जानेवारी सायंकाळी साडेसात ते आठ दरम्यान अमरीशनगरमधील कालू गणपत पावरा याच्याकडे भीक मागण्यासाठी गेला होता. त्याचा राग आल्याने कालूने हातात काठी घेत चैन्याच्या डोक्यावर व तोंडावर वार केले.या मारहाणीत चैन्याला वर्मी घाव लागल्यामुळे बेशुद्ध होत जमिनीवर कोसळल. त्यानंतर कालूने त्याला ओढत नेत गावातील भाईदास भिल यांच्या घराशेजारी गटारीजवळ टाकून पसार झाल्याची तक्रार मयताचा भाऊ रामसिंह पावरा याने थाळनेर पोलिसात दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासातच थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक उमेश बोरसे यांनी संशयित कालू गणपत पावरा अटक केली आहे पुढील तपास ए पी आय उमेश बोरसे करत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने