न्यु खान्देश मराठी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना मिळणार मोफत टु-व्हिलर व फोर-व्हिलरचे लायसन्स....* *नुतन वर्षाच्या सुरूवातीस खेळीमेळीच्या वातावरणात संघाचा पहिला निर्णय....*


दोंडाईचा- येथे नुकतेच नव्याने स्थापन झालेल्या न्यु खान्देश मराठी पत्रकार संघाची बैठक नयनरम्य संध्याकाळच्या खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. बैठकीत सर्वानुमते नुतन अध्यक्ष यांनी स्वखर्चाने सर्व सदस्यांना मोफत टु-व्हीलर व फोर-व्हिलरचे लायसन्स मिळवून देण्याबाबत मागणी करण्यात आली. त्यास नुतन अध्यक्ष अख्तर शहा यांनी क्षणात होकार भरला व सर्व सदस्यांना २६ जानेवारी पर्यंत कागदपत्रे कार्यालयात आणून द्यायचे आवाहन केले.
धुळे रोडवरील विखुर्ल कारखानाच्या रस्त्यावर असलेल्या शेतात शुक्रवारीच्या संध्याकाळी झालेल्या नयनरम्य बैठकीत प्रथम न्यु खान्देश मराठी पत्रकार संघाची धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी बाबत विषय घेण्यात आला. तसेच बरेच पत्रकार बांधवांनकडे दोन-चाकी,चार-चाकी गाडी असुन वाहन परवाना नसल्याने, त्यांना अनेकवेळा पत्रकाराचे ओळखपत्र असल्यावरही पोलीसांकडून दंड आकारण्यात येतो.म्हणून ज्या नुतन सदस्यांकडे दोन-चाकी व चार-चाकी गाडी येत असेल पण लायसन्स-वाहन परवाना नसेल,असे कोणतेही फक्त एक लायसन्स-वाहन परवाना अध्यक्ष हे स्वखर्चाने बनवून देतील,, अशी मागणी सर्व सदस्यांनी केली.त्यास न्यु खान्देश मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यांनी क्षणात होकार भरत  येत्या २६ जानेवारी २०२२ पर्यंत सर्व सदस्यांनी आहिल्याबाई शापींगमधील गाळा क्रमांक १५-१६ मधील संघाच्या कार्यालयात अथवा प्रत्यक्ष मला भेटून एक आधार कार्ड, जन्म दाखला,पँन कार्ड,चार फोटो आदी कागदपत्रांचा संच आणावा, असे बैठकीच्या शेवटी आवाहन केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने