इगतपुरी व नाशिककरांसाठी दिलासा दायक आनंदाची बातमी






 नाशिक - इगतपुरी मेमू एक्सप्रेस (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पज युनिट) ही ८ डब्यांची रेल्वे गाडी येत्या १० जानेवारी पासून सुरू होणार आहे.त्यामुळे हाजारो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
     खरे तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अनेक कामांसाठी रेल्वेने मेघा ब्लॉक घेतला त्यामुळे नाशिक - मनमाड मार्गावरच्या तब्बल १८ गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे.मात्र या नव्या रेल्वेच्या बातमीने या मार्गावरील प्रवाशांचे चेहरे उजळले आहेत.
असा आहे मार्ग व वेळ -- 
भुसावळ - नाशिक - इगतपुरी मेमू ही लोकल गाडी ८ डब्यांची असणार आहे ही गाडी भुसावळ जंक्शन स्थानकावरून सकाळी ७ वाजता मार्गस्थ होईल ७:२६ वाजता जळगाव,१०:०९ चाळीसगांव, १२:०८ मनमाड, १:२३ नाशिक आणि त्या नंतर साधारणतः दुपारी ३ च्या सुमारास ही गाडी इगतपुरी येथे पोहोचेल. तसेच परतीच्या प्रवासात सकाळी ९:१५ वाजता ही गाडी इगतपुरी स्थानकातून निघेल आणि भुसावळ येथे सायंकाळी ५:१० वाजता पोहोचेल अशी माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे. 
   दरम्यान नाशिक - कल्याण मेमू लोकल लवकर सुरू होणार म्हणून चर्चित असणारी केंव्हा सुरू होणार अशी विचारणा आता नागरिकां मधुन होत आहे.या रेल्वेला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या नावाखाली ही मागणी बासनात गुंडाळून ठेवली.त्या नंतर "वंदे मातरम्" मेमू लोकल ट्रेन ची चर्चा सुरू झाली यात दिवसा मागून दिवस सरत गेले मात्र नाशिककरांसाठी अतिशय महत्त्वाची असणारी मेमू लोकल काही सुरू झाली नाही.मात्र पुन्हा कालांतराने मेमू लोकल सुरू होईल अशी घोषणा रेल्वेने केल्याने इगतपु - नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
           या लोकलचा चाकरमान्यांन पासून ते थेट विद्यार्थ्यां पर्यंत सा-यांनाच मोठा फायदा होणार आहे आता महापालिका निवडणुकी पुर्वी तरी ही मेमू लोकल ट्रेन सुरु होईल कायाची सा-यांना उत्सुकता आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने