धुळे, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलिस कवायत मैदान, धुळे येथे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल व ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ होणार आहे. कोरोना विषाणूची पार्श्वभूमी लक्षात घेता ध्वजारोहण समारंभास सर्वांसाठी मास्क लावणे आणि सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी कळविले आहे.
Tags
news
