राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी : पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांचे आवाहन




धुळे, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, अशी दक्षता प्रत्येकाने घ्यावी. सामाजिक संस्थांनी राष्ट्रीय ध्वज इतस्त: दिसून आल्यास स्वयंसेवकांच्या माध्यमातून संकलन करून योग्य त्या सन्मानाने विल्हेवाट लावावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की राष्ट्रीय सणाच्या दिवशी लहान आकारातील कागदी व प्लास्टिक राष्ट्रध्वजांची मोठ्या प्रमाणत खरेदी व विक्री केली जाते. लहान मुलांसह अनेक व्यक्ती राष्ट्रभक्तीमुळे राष्ट्रध्वज खरेदी करतात. ते ध्वज त्याच दिवशी व दुसऱ्या दिवशी इतस्त: टाकले जाण्याची व त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्थांनी स्वयंसेवकांमार्फत राष्ट्रध्वज संकलित करून त्यांची सन्मानाने विल्हेवाट लावावी, असेही पोलिस अधीक्षक श्री. पाटील यांनी म्हटले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने