मुंबई - भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टातर्फे रद्द करण्यात आल्यानंतर या 12 आमदारांमध्ये सामील असलेल्या शिंदखेडा मतदार संघातील माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या दालनात राडा केल्यामुळे, अध्यक्षांना शिवीगाळ केल्याने तसेच तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप लावत भाजपच्या 12 आमदारांचे 5 जुलै 2021 रोजी वर्षभराकरिता निलंबन करण्यात आले होते. यावर भाजपतर्फे सुप्रीम कोर्टामध्ये यासंदर्भात धाव घेण्यात आलेली होती. आणि याचा महत्त्व पूर्ण आज सुपीम निर्णय आज सुप्रीम कोर्टातर्फे देण्यात आलेला आहे
Tags
news