दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह तीन जणांना लाखोंच्या मालासह केले जेरबंद




धुळे  - तालुका पोलिसांनी मध्यप्रदेश मधून विदेशी दारूचा मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाहतूक होत असलेल्या मद्याचा साठा हस्तगत केला आहे. या कारवाई दरम्यान धुळे तालुका पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मध्यप्रदेशातून नंदुरबार मार्गे धुळे तालुक्यातून अवैधपणे विदेशी दारू ट्रकमधून वाहतूक केली जात असल्याची माहिती गुप्त माहिती दारा मार्फत धुळे तालुका पोलिस अधिकाऱ्यांना मार्फत धुळे तालुका पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली होती. या संदर्भात तपास सुरू असताना धुळे तालुक्यातील मुक्टी परिसरामध्ये एका हॉटेलच्या बाहेर संबंधित ट्रक व स्कार्पिओ कार ही पोलिसांना आढळून आली, पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याचा साठा आढळून आला आहे. या ट्रकमध्ये जवळपास विदेशी कंपनीच्या दारूचे 255 बॉक्स पोलिसांना आढळून आले. ज्यांची बाजारामध्ये 32 लाख 74 हजार इतकी किंमत मानली जात आहे. या कारवाईमध्ये ट्रक सह स्कार्पिओ कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने