शिरपुरात तलाठ्यास दमदाटी करीत वाळूचे ट्रॅक्टर पळवले




धुळे वाळूची अवैध वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करणाऱ्या तलाठीस अडवणुक करीत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याची घटना शिरपूर येथे घडली. याप्रकरणी तलाठी पृथ्वीराज गिरासे यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काल २६ रोजी दुपारी १२ ते १२. ३० वाजेच्या सुमारास तलाठी पृथ्वीराज गिरासे यांच्यासह महसुक कर्मचाऱ्यांनी अरुणावती नदी पात्रातून गौण खजिन वाळू अवैधपणे उपसा करुन तीची चोरटी विक्री करण्यासाठी वाहतुक करून नेत असतांना ट्रॅक्टर पकडले. यावेळी दिपक कोळी आणि किशोर कोळी रा. गजानन कॉलनी, शिरपूर या दोघांनी कारवाईस विरोध करीत तलाठीला अडवणुक केली आणि हातातील मोबाईल हिसकावून घेत ट्रॅक्टर घेवून पळून गेले .
विरोध करीत तलाठीला अडवणुक केली आणि. यावरुन दिपक कोळी, किशोर कोळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने