शिरपूर प्रतिनिधी - तालुक्यातील करवंद येथील सरपंच श्रीमती मनिषाताई देवेंद्र पाटील यांना नुकताच
राज्यस्तरीय सरपंच भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्याप्रित्यर्थ *शिरपूर तालुका सरपंच महासंघ* तर्फे प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
सौ पाटील यांचा 26 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे ईगल ब्रॅण्ड बायकॉन 2021 सरपंच भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
सत्कार प्रसंगी शिरपूर तालुका सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, महिलाअध्यक्षा प्रियंका अरविंद पावरा, करवंद गण पं स सदस्य चि यतिश सोनवणे, शिंगावे गण पं स सदस्य चंद्रकांत पाटील, सरपंच महासंघ तालुका उपाध्यक्ष राजेंद्रतात्या पाटील, सावेर सरपंच तथा कोषाध्यक्ष नाना वाघ, हिंगोणी सरपंच सोमा भिल, सरपंच महासंघ संपर्क प्रमुख श्री चंद्रकांत उर्फ भुराभाऊ पाटील शिंगावे उपस्थित होते.
Tags
news
