कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचे 4 लाख मे. टन गाळप पूर्ण प्रतिनिधी दत्ता पारेकर




        पुणे:महात्मा फुलेनगर (बिजवडी ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने चालु सन 2021-22 च्या गळीत हंगामामध्ये आज शुक्रवार (दि.31) अखेर 4 लाख 1111 मे. टन ऊसाचे गाळप पुर्ण करून महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.
      कारखान्याचा चालू गळीत हंगाम उत्कृष्ठपणे सुरु असून दररोज प्रतिदिनी सरासरी 9000 मे. टना हुन अधिक क्षमतेने ऊसाचे गाळप केले जात आहे. कारखान्याचे सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प आदी उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प पुर्ण कार्यक्षमतेने चालु आहेत, अशी माहीती कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा व कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी दिली. 
       कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी  कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उत्पादकांशी गटनिहाय बैठका घेऊन संवाद साधला. या संवाद बैठकांचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसत आल्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगन भोंगळे, प्रदीप पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, वसंत मोहोळकर, शारदा पवार, कांचन कदम उपस्थित होते. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने