- सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त गरुड वाचनालय येथे युवकमित्र परिवार आयोजित 'शब्दयोद्धा' राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पुणे येथील अश्विनी टाव्हरे हिने प्रथम क्रमांक पटकावत शब्दयोद्धा चषकावर नाव कोरले.तर कोल्हापूर येथील तेजस पाटील,यवतमाळची प्रतीक्षा गुरुनुले यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.यावेळी विजेत्यांना अनुक्रमे सात हजार रु,पाच हजार रु,तीन हजार रुपये रोख व वक्तृत्व चषक करंडक प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.शहीद जवानांवर आधारित विषयात उत्कृष्ट विचार व्यक्त करणाऱ्या सातारा येथील मिथुन माने या विजेत्यास शहीद नायब सुभेदार सुरेश काळंगे कमांडो चषक देऊन सन्मानित करण्यात आले.महेश अहिरे,श्रुती बोरस्ते, मंदार लटपटे,जालिंदर जगताप यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
युवकमित्र परिवार या संस्थेमार्फत धुळे शहरात दरवर्षी शब्दयोद्धा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते.या स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यभरातून स्पर्धेक सहभाग नोंदवत असतात.सलग दुसरे वर्ष असलेल्या या स्पर्धेचे उदघाटक म्हणून ज्येष्ठ कामगार नेते बी.एन.बिरारी हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन म्हसे हे होते.प्रमुख अतिथी म्हणून मालेगावच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विजयालक्ष्मी अहिरे,साई फाउंडेशनचे महेंद्र जगताप,युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन,पत्रकार ज्ञानेश्वर माळी, सुरेश देवरे हे होते.यावेळी मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार सचिन परब,प्रा.विलास चव्हाण,प्रा.पंडित गायकवाड,जवान चंदू चव्हाण प्रवीण शिंदे,सुहास खाडे यांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.परीक्षक म्हणून माजी प्राचार्य विलास चव्हाण,श्री.स्वामीराज भिसे यांनी काम पाहिले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर शितोळे, प्रसाद जगताप,रोहित ठाकूर,धर्मेंद्र हिरे,प्रसाद महाले यांनी परिश्रम घेतले तर ऋतुजा जगदाळे,प्रफुल्ल माळी यांनी सूत्रसंचालन केले.आभार बालवक्ते रुषांक जाधव यांनी मानले.
Tags
news
